Cricket Buzz»फोटो गॅलरी »रोहित शर्मानं इंस्टाग्रामवर केलं अनफॉलो; अनुष्कानं दिलं उत्तररोहित शर्मानं इंस्टाग्रामवर केलं अनफॉलो; अनुष्कानं दिलं उत्तर By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 1:53 PMOpen in App1 / 7वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर टीम इंडियातील वाद चव्हाट्यावर आला होता. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या एकाधिकारशाहीमुळे संघातील काही वरिष्ठ खेळाडू नाराज होते. 2 / 7या सर्व अफवा असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ( बीसीसीआय) सांगण्यात आले. पण, कोहली अन् रोहित यांच्यातील वादाच्या अफवेत ठिणगी टाकणारा प्रसंग घडला आहे. आतापर्यंत रोहित आणि कोहली या दोघांनीही त्यांच्यातील मतभेदावर कोणतेही वक्तव्य केले नाही. 3 / 7रोहितनं सोशल मीडियावर कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला अनफॉलो केल्यानं या वादाला नवा रंग येण्याची चर्चा सुरू झाली आहे. 4 / 7रोहितनं यापूर्वी कोहलीलाही अनफॉलो केले होते.पण, कोहली इंस्टाग्रामवर अजूनही रोहितला फॉलो करतो. पण, रोहितची पत्नी कोहलीच्या फ्रेंड लिस्टमध्ये अजूनही नाही. अनुष्कानं तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टेटस पोस्ट केला. 5 / 7अनुष्कानं लिहीलं की,''एक बुद्धीवंत व्यक्ती एकदा काहीच प्रतिक्रिया दिली नाही. खोटारडेपणा सुरू असताना केवळ सत्यच संयम राखू शकतो.'' 6 / 7अनुष्काचा या पोस्टचा रोख हा रोहितच्या दिशेनं असल्याची चर्चा आहे. 7 / 7अनुष्काही रोहित आणि रितिका या दोघांनाही इंस्टाग्रामवर फॉलो करत नाही. तसेच रितिकाही कोहली व अनुष्काला फॉलो करत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications