Cricket Buzz»फोटो गॅलरी »अर्जुन तेंडुलकरसोबत 'लंच डेट'वर जाणाऱ्या डॅनी वॅटचं 'विराट कोहली कनेक्शन' माहितीये का?अर्जुन तेंडुलकरसोबत 'लंच डेट'वर जाणाऱ्या डॅनी वॅटचं 'विराट कोहली कनेक्शन' माहितीये का? By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 8:14 PMOpen in App1 / 9Arjun Tendulkar Danielle Wyatt Virat Kohli टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने क्रिकेटचं विश्व गाजवलं. त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी झगडतोय. पण तत्पूर्वी, विराट कोहलीशी खास कनेक्शन असणाऱ्या डॅनी वॅटसोबत अर्जुनचं नाव जोडलं जात असल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत.2 / 9अर्जुन तेंडुलकर काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. या दरम्यान, एका व्हायरल फोटोमध्ये इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅट हिच्यासोबत तो लंच डेटवर गेला असल्याचं दिसत आहे. हा फोटो डॅनियल वॅटने स्वत:च्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.3 / 9अर्जुनचं नाव डॅनियल वॅट हिच्याशी जोडलं असतानाच, तिचं भारताचा महान फलंदाज विराट कोहली याच्याशी खास कनेक्शन आहे हे तुम्हाला माहितीये का?4 / 9अर्जुन डॅनियल वॅटसोबत लंडनमधील सोहो रेस्टॉरंटमध्ये लंच करतानाचा फोटो व्हायरल झाला. त्यानंतर डॅनी आणि विराट यांच्या एका खास कनेक्शनची चाहत्यांना आठवण झाली.5 / 9विराट कोहली हा लाखो तरूणींना आवडतो. विराटच्या लग्नानंतरही त्याचा तरूणींचा चाहतावर्ग अजिबात झालेला नाही. डॅनी वॅट तर विराटची सुरूवातीपासूनच खूप मोठी फॅन आहे. तिने विराटवरील प्रेमाची कबुलीही दिली आहे.6 / 9डॅनियल ने विराट आवडतो याची जाहीर कबुली तर दिलीच होती. पण ती तेवढ्यावरच थांबली नव्हती. डॅनियलने थेट विराटला लग्नासाठी प्रपोजदेखील केलं होतं. ट्वीटरवरून तिने आपला लग्नासाठीचा प्रस्ताव पाठवला होता.7 / 9त्यानंतर विराट आणि डॅनी यांची इंग्लंडमध्ये भेट झाली असताना विराटने डॅनियलला याबद्दल समजावले होते. 'अशाप्रकारचे ट्वीट्स करत जाऊ नकोस. कारण भारतातील लोक अशा गोष्टी फार गंभीरपणे घेतात', असं विराटने तिला सांगितले होते.8 / 9दरम्यान, अर्जुन तेंडुलकर आणि डॅनियल वॅट चांगले मित्र आहेत. जेव्हा जेव्हा अर्जुन इंग्लंडमध्ये असतो तेव्हा दोघे एकमेकांना भेटत असतात. या आधीही दोघांचे पर्यटन किंवा लंचचे फोटो व्हायरल झाले आहेत.9 / 9क्रिकेटबाबत बोलायचे झाल्यास, डॅनीने आतापर्यंत ९३ वन डे सामन्यांत १ हजार ४८९ धावा तर १२४ टी२० सामन्यात १ हजार ९६६ धावा केल्या आहेत. याशिवाय, वन डे क्रिकेटमध्ये तिच्या नावावर २७ तर टी २० क्रिकेटमध्ये ४६ बळी आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications