ते ३ खेळाडू, ज्यांना IPL 2022 मध्ये मिळायला हवी होती कमीतकमी एक संधी

आयपीएल 2022 च्या दहा संघांमध्ये असे काही खेळाडू होते ज्यांना एकही संधी मिळाली नाही. परंतु असे काही खेळाडू आहेत ज्यांना किमान एक संधी मिळायला हवी होती.

इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL च्या 15 व्या हंगामातील लीग सामने आता संपले आहेत. IPL 2022 चे 70 लीग सामने खेळले गेले. आता यातील चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले असून 6 संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

बाहेर पडलेल्या तीन संघांमध्ये असे खेळाडू होते ज्यांना किमान एक संधी मिळायला हवी होती. संघ स्पर्धेतून बाद झाला असला तरी तीन युवा खेळाडूंना संधी मिळाली नाही.

खरं तर, आम्ही सांगत आहोत अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar), यश धुल आणि राजवर्धन हंगरगेकर यांच्याबद्दल. अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने विकत घेतले, तर यश धुलला दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जने राजवर्धन हंगरगेकरवर बोली लावली होती.

या तीनही खेळाडूंना आयपीएलच्या या हंगामात एका संधीची आवश्यकता होती. टीमनं आपले 14-14 सामने खेळले, परंतु या खेळाडूंना एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.

या तीनही खेळाडूंना आयपीएलच्या या हंगामात एका संधीची आवश्यकता होती. टीमनं आपले 14-14 सामने खेळले, परंतु या खेळाडूंना एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.

मुंबईचे सर्व गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू मैदानावर संघर्ष करत होते. पण कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने त्यांना एकही संधी दिली नाही. नेटमध्येही तो चांगली गोलंदाजी करत होता. मुंबई इंडियन्सनेही त्याचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत.

दुसरा नंबर येतो तो म्हणजे यश धुलचा. यश धुलनं अंडर 19 वर्ल्ड कप जिंकवून दिला होता. अंडर 19 मध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर तो फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये यशस्वी ठरला. परंतु दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं त्याला एकही संधी दिली नाही. टीमचे अनेक फलंदाज आपल्या फॉर्मसाठई स्ट्रगल करतानाही दिसले होते.

तर दुसरीकडे आयपीएल 2022 ची सुरूवात होण्यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्सचा संघ दीपक चाहरच्या अनुपस्थितीत राजवर्धन हंगरगेकरला संधी देईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु रविंद्र जडेजानंतर धोनीकडे कर्णधारपद आलं. परंतु राजवर्धनला संधी मिळाली नाही. गोलंदाजीसाठी सीएसकेच्या गोलंदाजांनाही संघर्ष करावा लागला होता.