Join us  

Arjun Tendulkar Yograj Singh: "मी लिहून देतो- तू एक दिवस..."; अर्जुन तेंडुलकरच्या पाठीवर कोच योगराज सिंगकडून कौतुकाची थाप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 3:15 PM

Open in App
1 / 6

Arjun Tendulkar Yograj Singh: प्रत्येक गुरूला आपल्या शिष्याने काहीतरी चांगले केल्याचा अभिमान असतो. दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग यांनाही असाच अनुभव आला. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुनने त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याच्या पदार्पणाच्या रणजी सामन्यात धडाकेबाज शतक झळकावले.

2 / 6

अर्जुनला काही महिन्यांपूर्वी माजी वेगवान गोलंदाज, अभिनेता आणि प्रशिक्षक योगराज सिंग यांनी प्रशिक्षण दिले होते. तेव्हापासून असे बोलले जात होते की अर्जुनाला आता योग्य गुरु सापडला आहे.

3 / 6

योगराज सिंह हे अत्यंत कडक शिस्तीचे आहेत अशी त्यांची ओळख आहे. युवराज सिंगला अष्टपैलू बनवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. त्यातच काही महिन्यांनंतर अर्जुन तेंडुलकर त्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवताना दिसला होता.

4 / 6

योगराज सिंह म्हणाले की, युवराजने मला सप्टेंबरमध्ये फोन करून सांगितलं होतं की अर्जुन चंदीगड मध्ये आहे. सचिनचा आग्रह आहे की तुम्ही त्याला ट्रेनिंग द्यावं. मी देखील तयार झालो. आणि त्याला काही गोष्टी शिकवल्या.

5 / 6

त्याच प्रशिक्षणाचे फळ आता मला मिळाले आणि अर्जुनने राजस्थानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने २०७ चेंडूत १६ चौकार आणि २ षटकारांसह १२० धावांची शानदार खेळी खेळली.

6 / 6

योगराज सिंग यांच्या तालमीत तयार झालेल्या अर्जुनने गोव्याकडून राजस्थानविरुद्ध पोर्वोरिममध्ये रणजी पदार्पण केले. वडिलांप्रमाणेच त्यानेही पदार्पणाच्या सामन्यात दमदार शतक झळकावून एक पराक्रम रचला. अर्जुनच्या या दमदार खेळीनंतर योगराज सिंह यांनी त्याला मेसेज केला आणि त्याचं तोंडभरून कौतुक केलं आणि त्याला म्हणाले की... 'लिहून ठेव एक दिवस तू नक्कीच एक महान अष्टपैलू खेळाडू बनशील!'

टॅग्स :अर्जुन तेंडुलकररणजी करंडकगोवायुवराज सिंगसचिन तेंडुलकर
Open in App