Ashish Nehra Love Story Wife Rushma: भारताचा माजी क्रिकेटर आशिष नेहराने नुकत्याच झालेल्या IPL 2022 मध्ये गुजरातच्या संघाला मुख्य प्रशिक्षक म्हणून ट्रॉफी मिळवून दिली. त्यामुळे नेहराचं सर्वत्र कौतुक झालं. मात्र आज आपण त्याच्या लव्हस्टोरी बद्दल थोडंसं जाणून घेऊया.
आशिष नेहराचं लग्न २ एप्रिल २००९ ला दिल्लीत झालं. मूळची गुजराथी असलेल्या रुश्मा सोबत त्याने लग्नगाठ बांधली. रूश्मा ही एक आर्टिस्ट आहे.
पण लग्नाआधी त्यांची लव्हस्टोरी देखील चांगलीच रंगली होती. आशिष आणि रूश्मा यांची लव्ह कशी खुलली, त्यांनी लग्नाचा निर्णय कसा घेतला, याबद्दल नेहरानेच स्पष्ट केलं.
२००२ साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना रूश्मा ओव्हल मैदानावर सामना पाहायला पोहोचली होती. तेथे त्यांची ओळख झाली. इथूनच लव्हस्टोरीला सुरूवात झाली.
आशिष आणि रूश्मा यांनी मीडियापासून लपूनछपून तब्बल सात वर्षे एकमेकांना डेट केलं. पण लग्नाचा निर्णय मात्र आशिष नेहराने अवघ्या १५ मिनिटांतच घेतला होता, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं.
लग्न कधी करायचं ही चर्चा सुरू असताना १५ मिनिटांत मी निर्णय घेऊन टाकला आणि एका आठवड्याच्या आत आमचं लग्न झाले, असं आशिष नेहराने सांगितलं.
निर्णय घेतल्यावर रात्री उशिरा आशिषने रूश्माला कॉल करून प्रपोझ केलं आणि लग्नाबद्दल सांगितलं, पण तिला ते खरं वाटलं नाही म्हणून तिने काही उत्तर न देता फोन ठेवला.
पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा फोनवर बोलणं झाल्यानंतर तिने लग्नाला होकार दिला.
आशिष आणि रूश्मा नेहरा दाम्पत्याला एरियाना आणि आरुष अशी दोन मुलं आहेत. (सर्व फोटो- Instagram)