विराट, रोहित, अश्विनसह 'या' बड्या खेळाडूंनी २०२४ मध्ये घेतली निवृत्ती, पाहा 'रिटायरमेंट इलेव्हन'

Indian Cricketers Retired in 2024, Retirement XI: एका मराठी 'मॅचविनर' क्रिकेटपटूच्या नावाचाही आहे यादीत समावेश

२०२४ हे वर्ष संपत आले. या वर्षात भारतीय क्रिकेटमधील अनेक बड्या खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली. जाणून घेऊया कोण आहेत ते...

भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने टी२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर टी२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण तो अजूनही वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळत आहे.

भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने टी२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर टी२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण तो अजूनही वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळत आहे.

मराठमोळा क्रिकेटपटू केदार जाधव याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.

काही वादांमुळे चर्चेत आलेला यष्टीरक्षक वृद्धिमान साहा यानेदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटला कायमचा रामराम ठोकला.

कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात दमदार फिनिशर म्हणून नाव कमावणारा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटला अलविदा म्हटले.

भारताचा अष्टपैलू रवींद्र जाडेजाने टी२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर टी२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण तो अजूनही वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळत आहे.

भारतीय संघासाठी ७०० हून जास्त आंतरराष्ट्रीय विकेट्स मिळवणाऱ्या रविचंद्रन अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण तो क्लब क्रिकेट खेळत राहणार आहे.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज वरूण आरोन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

टीम इंडियासाठी फार सामने खेळण्याची संधी न मिळालेला वेगवान गोलंदाज बरिंदर सरन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

विराट कोहलीसोबत अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकणारा सिद्धार्थ कौल भारताच्या वरिष्ठ संघात फारसा प्रभावी ठरला नाही. त्यानेही क्रिकेटला अलविदा म्हटले.

मुंबई इंडियन्समधून आपल्या IPL कारकि‍र्दीची सुरुवात करणाऱ्या सौरभ तिवारीनेही या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. पण तो फ्रँचायजी क्रिकेट खेळताना दिसणार आहे.