Join us  

Asia Cup Final SL vs PAK prize money : आशिया चषकासह श्रीलंकेला १.१९ कोटी; उपविजेत्या पाकिस्तानला किती बक्षीस रक्कम मिळाली माहित्येय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 11:58 PM

Open in App
1 / 8

Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan prize money : वनिंदू हसरंगाने १७व्या षटकात तीन विकेट्स घेत सामना फिरवला अन् श्रीलंकने आशिया चषक २०२२ उंचावला... १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानचा संपूर्ण संघ १४७ धावांत तंबूत परतला आणि श्रीलंकेने २३ धावांनी विजय मिळवताना २०१४ नंतर आशिया चषक जिंकला. हसरंगा ( Wanindu Hasaranga) व भानुका राजपक्षा ( Bhanuka Rajapaksa ) यांनी फलंदाजीत कमाल करताना श्रीलंकेला १७० धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कमाल करताना पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडले.

2 / 8

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तानने दमदार सुरुवात केली. कुसल मेंडीस ( ०), पथूम निसंका ( ८), दानुष्का गुणतिलका ( १), कर्णधार दासून शनाका ( २) व धनंजया डी सिल्वा ( २८) हे फलकावर ५८ धावा असताना माघारी परतले. वनिंदू हसरंगा ( Wanindu Hasaranga) व भानुका राजपक्षा ( Bhanuka Rajapaksa ) यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. ३६ चेंडूंत ५८ धावांची ही भागीदारी रौफने संपुष्टात आणली. हसरंगा २१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३६ धावांवर माघारी परतला.

3 / 8

राजपक्षाचा झेल टिपण्याच्या प्रयत्नात शादाब खान व आसीफ अली यांच्यात जोरदार टक्कर झाली. आसीफच्या हातात येणारा सोपा झेल शादाबच्या डाईव्हमुळे सीमापार गेला अन् श्रीलंकेला षटकार मिळाला. शादाबला आजच्या सामन्यात दुसऱ्यांदा दुखापत झाली. राजपक्षाने सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसह ३१ चेंडूंत ५४ धावा जोडल्या व संघाला ६ बाद १७० धावांचा टप्पा गाठून दिला. राजपक्षाने ४५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७१ धावा केल्या.

4 / 8

कर्णधार बाबर आजम याचा अपयशाचा पाढा अंतिम सामन्यातही कायम राहिला. मोहम्मद रिझवान व इफ्तिकार अहमद यांनी पाकिस्तानचा डाव सावरताना ५९ चेंडूंत ७१ धावा जोडल्या. ही डोईजड झालेली जोडी तोडण्यासाठी पुन्हा मदुशानला गोलंदाजीला बोलावले गेले आणि त्याने त्याचे काम केले. त्याने टाकलेला संथ चेंडू अहमदने उत्तुंग टोलावला अन् के बंडाराने अप्रतिम झेल घेतला. अहमद ३१ चेंडूंत ३२ धावांवर बाद झाला.

5 / 8

पाकिस्तानला विजयासाठी ३० चेंडूंत ७० धावांची गरज असताना चमिका करुणारत्नेने मोठा धक्का दिला. संथ व आखूड चेंडू टाकून त्याने मोहम्मद नवाजला फटका मारण्यास भाग पाडले. मदुशानने सुरेख झेल टिपत नवाजला ६ धावांवर माघारी पाठवले. रिझवानने षटकार खेचून ४७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि संघावरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला.

6 / 8

चार षटकांत ६१ धावा पाकिस्तानला करायच्या होत्या. वनिंदू हसरंगाने १७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रिझवानची विकेट घेतली. षटकार मारण्याच्या प्रयत्नात रिझवान ( ५५ धावा) गुणतिलकाच्या हाती झेलबाद झाला. एका चेंडूच्या अंतराने हसरंगाने आणखी एक विकेट घेताना आसीफ अलीचा ( ०) त्रिफळा उडवला. त्याच षटकात खुशदील शाह ( २) याला बाद करून पाकिस्तानची अवस्था त्याने ७ बाद ११२ अशी केली.

7 / 8

महिष थिक्षानाने ८वा धक्का दिला, तर मदुशानने समन्यातील चौथी विकेट घेतली. मदुशानने ३४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. ६ चेंडूत ३२ धावा करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ १४७ धावांत तंबूत परतला. करुणारत्नेने पाकिस्तानचा अखेरचा फलंदाज हॅरीस रौफला ( १३) त्रिफळा उडवला.

8 / 8

आशिया चषक २०२२च्या चॅम्पियन श्रीलंकेला १,१९,४९,०००रुपये (अंदाजे) इतकी मोठी रक्कम मिळाली. उपविजेत्या पाकिस्तानला ५९,७४,००० रुपयांचा धनादेश दिला गेला. पाकिस्तानने २०१२ मध्ये आशिया चषक जिंकला होता, तर श्रीलंकेने २०१४ मध्ये अखेरचा ट्रॉफी जिंकला होता.

टॅग्स :एशिया कप 2022पाकिस्तानश्रीलंका
Open in App