Join us  

बांगलादेशविरुद्ध ४ बदलासह भारत मैदानावर उतरणार; विराटसह पाहा कोणाला 'आराम' मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 10:37 PM

Open in App
1 / 6

श्रेयस अय्यरला पाठीच्या दुखापतीमुळे पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळता आले नव्हते. पण, आज त्याने २० मिनिटे नेट मध्ये सराव केला, परंतु तो १०० टक्के तंदुरुस्त दिसत नाही, त्यामुळे बांगलादेशविरुद्धही त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तो ही मॅच मुकला तर फायनलमध्येही त्याचे खेळणे संभव नाही.

2 / 6

लोकेश राहुलने दमदार पुनरागमन केले आहे आणि इशान किशनने मिळालेल्या संधीवर दमदार कामगिरी करून संघ व्यवस्थापनाला शंका घेण्यासाठी वाव ठेवलेला नाही. अशात अय्यरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ वन डे सामन्यांच्या मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे.

3 / 6

दरम्यान, उद्या होणाऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांना विश्रांती मिळू शकते. हे दोघंही आशिया चषक स्पर्धेत ४ सामने खेळले आहेत. जसप्रीतने नुकतेच दुखापतीतून पुनरागमन केले आहे आणि त्यामुळे त्याच्यावरील वर्क लोड कमी करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. सिराजलाही विश्रांती दिल्यावर मोहम्मद शमी व प्रसिद्ध कृष्णा यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवता येऊ शकते.

4 / 6

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शार्दूल ठाकूरला विश्रांती देऊन अक्षर पटेलला खेळवले होते, परंतु यावेळेस हार्दिक पांड्याला विश्रांती दिली जाईल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पांड्या यांच्याजागी बांगलादेशविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा व शार्दूल ठाकूर यांची एन्ट्री होईल.

5 / 6

हे झालं गोलंदाजीच्या विभागाचं.. फलंदाजीमध्ये सूर्यकुमार यावद व तिलक वर्मा हेही संधीच्या प्रतीक्षेत आहेत. सूर्यकुमार हा वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाचा भाग असल्याने त्याला संधी दिली जाऊ शकते. पण, त्यासाठी आघाडीच्या फळीतील एकाला विश्रांती द्यावी लागेल आणि कदाचित विराट कोहलीला ती दिली जाईल.

6 / 6

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन ( वि. बांगलादेश) - रोहित शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध बांगलादेशविराट कोहलीजसप्रित बुमराहमोहम्मद सिराज