Join us  

Asia Cup: भारत - पाकिस्तान पुन्हा भिडणार; 'या' 5 जोड्या एकमेकांना जोरदार 'खुन्नस' देणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 4:13 PM

Open in App
1 / 6

IND vs PAK, Asia Cup 2023 Top 5 battle: आशिया चषक 2023 मध्ये भारतीय संघ पाकिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. शनिवारी, २ सप्टेंबर रोजी कॅंडी येथे सामना रंगणार आहे. या सामन्यात ५ अशा जोड्या आमने-सामने येणार आहेत, ज्याकडे संपूर्ण जगाच्या क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

2 / 6

फखर जमान विरुद्ध जसप्रीत बुमराह - 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल कोण विसरू शकेल. फखरला बुमराहने बाद केले पण अंपायरने तो नो बॉल दिला. यानंतर फखरने शतक ठोकले आणि भारताचा पराभव झाला. फखर जमान पुन्हा एकदा नव्या चेंडूवर बुमराहसमोर असेल. बुमराहने एकदिवसीय सामन्यात 45 चेंडूंत केवळ एकदा फखरला बाद केले आहे आणि केवळ 25 धावा दिल्या आहेत.

3 / 6

विराट कोहली विरुद्ध हरिस रौफ - या द्वंद्वाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. २०२२ च्या टी-२० विश्वचषकात विराट कोहलीने रौफविरुद्ध सलग दोन चेंडूंत दोन षटकार मारून सामना भारताकडे वळवला. पुन्हा एकदा रौफचा वेग आणि विराटची बॅट यांच्यात टक्कर होणार आहे. आतापर्यंत टी-20 मध्ये विराटने रौफविरुद्ध 32 चेंडूत 42 धावा केल्या आहेत.

4 / 6

श्रेयस अय्यर विरुद्ध शादाब खान - श्रेयस अय्यर तब्बल 8 महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन करत आहे. आतापर्यंत त्याने शादाब खानविरुद्ध कधीही फलंदाजी केलेली नाही. पण दोघांमधील युद्ध विशेष असणार आहे. अय्यर फिरकीविरुद्ध शानदार फलंदाजी करतो. तर शादाब चांगलाच फॉर्मात आहे. अशा स्थितीत भारताचा आघाडीचा मधल्या फळीतील फलंदाज आणि पाकिस्तानचा आघाडीचा फिरकीपटू यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.

5 / 6

बाबर आझम विरुद्ध कुलदीप यादव - बाबर आझमची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. 2019 च्या विश्वचषकात कुलदीपने बाबरला ज्या प्रकारे बॉलिंग केले ते कोण विसरू शकेल. 2018 च्या आशिया कपमध्येही बाबरला कुलदीपने बोल्ड केले होते. आतापर्यंत कुलदीप यादवविरुद्ध ३४ चेंडूत १८ धावा करताना बाबर दोनदा बाद झाला आहे. या दोघांमध्ये पुन्हा एकदा स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

6 / 6

रोहित शर्मा विरुद्ध शाहीन आफ्रिदी - शाहीन आफ्रिदी सुरुवातीच्या षटकांमध्ये खूपच धोकादायक आहे. 2021 च्या T20 विश्वचषकाच्या पहिल्याच षटकात त्याने रोहित शर्माची विकेट घेतली. नेपाळविरुद्धच्या सामन्यातही त्याने पहिल्याच षटकात दोन विकेट घेतल्या होत्या. तो भारतीय कर्णधार रोहित शर्माशी कडवी झुंज देऊ शकतो. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये शाहीनविरुद्ध 19 चेंडूत 18 धावा केल्या आहेत.

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्माबाबर आजमविराट कोहली
Open in App