Join us  

asia cup 2023 : आता मिशन 'आशिया', टीम इंडिया श्रीलंकेला रवाना; शनिवारी पाकिस्तानशी भिडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 5:39 PM

Open in App
1 / 10

आशिया कप २०२३ साठी भारतीय क्रिकेट संघ बुधवारी श्रीलंकेला रवाना झाला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध शनिवारी होणार आहे. बुधवारपासूनच या स्पर्धेला सुरुवात झाली आहे.

2 / 10

सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुल्तान येथे खेळवला जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे लोकेश राहुल टीम इंडियासोबत श्रीलंकेला गेलेला नाही. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बंगळुरूमध्ये आहे.

3 / 10

राहुल पहिल्या दोन सामन्यात खेळणार नाही. तिलक वर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी फ्लाइटमधील फोटो शेअर केले आहेत.

4 / 10

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने देखील भारतीय शिलेदारांची झलक शेअर केली आहे.

5 / 10

आशिया चषकात सरप्राईज एन्ट्री झालेल्या तिलक वर्माने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्याच्यासोबत कुलदीप यादव आणि सूर्यकुमार यादवही दिसत आहेत.

6 / 10

त्याचवेळी रवींद्र जडेजाने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये फोटो शेअर केला आहे. श्रीलंकेला रवाना झाल्याचा उल्लेखही त्याने केला आहे.

7 / 10

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानात आजपासून आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होत आहे. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुल्तान येथे होत आहे.

8 / 10

खरं तर अनेक नाट्यमय घडामोडींनंतर या स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत.

9 / 10

नेपाळविरूद्धचा सामना झाल्यानंतर पाकिस्तानी संघ ३१ ऑगस्ट रोजी भारताविरूद्धच्या सामन्यासाठी श्रीलंकेला रवाना होईल. भारत आणि पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी २ सप्टेंबरला आमनेसामने असतील.

10 / 10

बाबर आझम (कर्णधार), अब्दुला शफीक, फखर झमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैयब ताहिर, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शादाब खान, मोहम्मद नवाज, उस्मान मीर, फहीम अशरफ, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, सौद शकील, शाहीन आफ्रिदी. (राखीव - तैय्यब ताहिर)

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App