Join us  

खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, तरीही IPL 2020 होऊ न देण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील; आखला खास प्लान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 12:51 PM

Open in App
1 / 9

खान यांनी सांगितले की,''आशिया चषक नियोजित वेळापत्रकानुसार होईल. श्रीलंकेत कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे आणि तेथेच आशिया चषक खेळवण्याचा प्रयत्न असेल. श्रीलंकेनं स्पर्धा आयोजनास नकार दिल्यास, यूएई हा पर्याय आहे. आमचे खेळाडू 2 सप्टेंबरला इंग्लंड दौऱ्यातून मायदेशात परततील. त्यानंतर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवण्यात येईल.''

2 / 9

पाकिस्तानचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं इंग्लंड दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तरीही या दौऱ्याबाबत पीसीबी सकारात्मक आहेत. याच दौऱ्याबाबत नाही, तर आशिया चषक स्पर्धेबाबतही पीसीबीनं मोठं विधान केलं आहे.

3 / 9

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) ट्वेंटी- 20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबत अजूनही विचार करत आहे. या स्पर्धेवरही अनिश्चिततेचं सावट आहे आणि दोन वेळा बैठक होऊनही काही निर्णय घेण्यात आलेला नाही.

4 / 9

आयसीसीच्या या निर्णयावर इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमाचे भवितव्य अवलंबून आहे. तरीही बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनं आयपीएलच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

5 / 9

आयपीएलसाठी बीसीसीआय सप्टेंबर-नोव्हेंबर या कालावधीचा विचार करत आहे. बीसीसीआयच्या या प्रयत्नांना पीसीबीकडून सुरुवातीपासून विरोध आहे. स्थानिक स्पर्धेसाठी ट्वेंटी-20 स्पर्धा रद्द होऊ देणार नाही, असे पीसीबीनं स्पष्ट केले आहे.

6 / 9

आता त्यांनी त्यासाठी जोरात प्रयत्न सुरू केले आहेत. कोणत्याही परिस्थिती आशिया चषक स्पर्धा होईल, असा दावा पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी केला आहे.

7 / 9

टीम इंडियाचा पाकिस्तानात खेळण्यास विरोध आहे आणि त्यामुळे आशिया चषक श्रीलंका किंवा संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यासाठी पीसीबी प्रयत्नशील आहे. ही स्पर्धा सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात खेळवण्यात येईल, असेही खान यांनी स्पष्ट केले.

8 / 9

खान यांनी सांगितले की,''आशिया चषक नियोजित वेळापत्रकानुसार होईल. श्रीलंकेत कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे आणि तेथेच आशिया चषक खेळवण्याचा प्रयत्न असेल. श्रीलंकेनं स्पर्धा आयोजनास नकार दिल्यास, यूएई हा पर्याय आहे. आमचे खेळाडू 2 सप्टेंबरला इंग्लंड दौऱ्यातून मायदेशात परततील. त्यानंतर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवण्यात येईल.''

9 / 9

आशिया चषक स्पर्धा खेळवल्यास आयपीएलच्या नियोजनला मोठा धक्का पोहचू शकतो.

टॅग्स :आयपीएल 2020पाकिस्तानएशिया कप