Join us  

AUS vs SA: बॉक्सिंग-डे कसोटीत नेमकं चाललंय काय? 2 खेळाडू रक्तबंबाळ, एकाने लंगडत सोडलं मैदान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 6:36 PM

Open in App
1 / 9

बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात खेळाडूंना दुखापत होण्याची मालिका सुरूच आहे. दक्षिण आफ्रिकेसोबतच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनचे तीन खेळाडू एकापाठोपाठ एक जखमी झाले. पहिल्याच दिवशी मिचेल स्टार्कला दुखापत झाली होती.

2 / 9

तर डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या दिवशी रिटायर्ड-हर्ट झाला आणि काही वेळाने त्याचा सहकारी ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमेरून ग्रीनच्या बोटालाही रक्तस्त्राव झाला, त्यामुळे त्यालाही मैदान सोडावे लागले.

3 / 9

सामन्याच्या पहिल्या दिवशी दुखापत झाल्यामुळे मिचेल स्टार्क आगामी तिसऱ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टार्क गैरहजर असणार आहे. दुसऱ्या सत्राच्या पहिल्या दिवशी लाँग ऑनवर झेल घेण्याचा प्रयत्न करताना स्टार्कला डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली.

4 / 9

खरं तर ज्या हाताने स्टार्क गोलंदाजी करतो त्याच हाताला दुखापत झाल्याने कांगारूच्या संघाच्या अडचणीत वाढ झाली. 32 वर्षीय वेगवान गोलंदाजाने 13 षटकांत 39 धावा देत दोन बळी घेतले आणि दुखापतीमुळे मैदान सोडले.

5 / 9

डेव्हिड वॉर्नरने आपल्या 100व्या कसोटी सामन्यात दुहेरी शतक झळकावून टीकाकारांची बोलती बंद केली. मात्र, 200 धावा केल्यानंतर वॉर्नर एकही चेंडू खेळू शकला नाही रिटायर्ड हर्ट झाला.

6 / 9

स्नायूंच्या ताणामुळे त्याला मैदान सोडावे लागले. सहकारी खेळाडू आणि फिजिओच्या मदतीने त्याला लंगडत ड्रेसिंग रूममध्ये नेण्यात आले, त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कॅमेरून ग्रीनलाही जोरदार चेंडू लागला.

7 / 9

एनरिक नॉर्तजेचा वेगवान चेंडू ग्रीनच्या ग्लोव्हजला लागला. तेवढ्यात त्याने हातमोजे काढले असता बोटातून रक्त येत होते. आयपीएलमध्ये 17.5 कोटींना विकल्या गेलेल्या या अष्टपैलू खेळाडूला घाईघाईने स्कॅनसाठी पाठवण्यात आले.

8 / 9

ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, कॅमेरून ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलंड.

9 / 9

दक्षिण आफ्रिकेचा संघ - डीन एल्गर (कर्णधार), सारेल एरवी, थेउनिस डे ब्रुन, टेम्बा बवुमा, खाया झोंडो, काइल व्हेरेने (यष्टीरक्षक), मार्को जॅन्सन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्तजे, लुंगी एनगिडी.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरआॅस्ट्रेलियाद. आफ्रिका
Open in App