AUS vs WI : मार्नस लाबुशेनचा पराक्रम! सुनील गावस्करांच्या १९७१ सालच्या विक्रमाशी बरोबरी, तेंडुलकरलाही हे जमले नाही

AUS vs WI, perth test : ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध वर्चस्व गाजवले आहे. यात मार्नस लाबुशेन यानं मोठा विक्रम केलाय.

ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध वर्चस्व गाजवले आहे. यात मार्नस लाबुशेन यानं मोठा विक्रम केलाय.

ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ४ बाद ५९८ धावांवर घोषित केला आणि प्रत्युत्तरात विंडीजचा संघ २८३ धावांवर गडगडला

फॉलोऑन न देता ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव २ बाद १८२ धावांवर घोषित करून विंडीजसमोर ४९८ धावांचे लक्ष्य ठेवले.

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मार्नस लाबुशेन ( २०४) आणि स्टीव्ह स्मिथ ( २००*) यांनी द्विशतक झळकावले.

मार्नसन लाबुशेन याने दुसऱ्या डावातही ११० चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०४ धावांची खेळी केली.

एकाच कसोटीत द्विशतक व शतक झळकावणारा मार्नस लाबुशेन हा ऑस्ट्रेलियाचा तिसरा अन् जगातील ८वा फलंदाज ठरला.

यापूर्वी डॉज वॉल्टर्स ( वि. वेस्ट इंडिज, १९६९), सुनील गावस्कर ( वि. वेस्ट इंडिज, १९७१), लॉरेन्स रोव ( वि. न्यूझीलंड, १९७२), ग्रेग चॅपल ( वि. न्यूझीलंड, १९७४), ग्रॅहम गूच ( वि. भारत, १९९०), ब्रायन लारा ( वि. श्रीलंका, २००१), कुमार संगकारा ( वि. बांगलादेश, २०१४) यांनी हा पराक्रम केला आहे.