वॉर्नरने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, "माझ्या मनात खूप भावना आहेत. मी तुझ्याबद्दल काय बोलू... कँडिस, प्रामाणिकपणे सांगायचे तर आज मी जिथे आहे तिथे मला पोहोचवण्यात तुझी खूप मदत झाली. हे मी याआधीही अनेकवेळा सांगितले आहे पण मी ते पुन्हा सांगतो. तू पहाटे ४ वाजता उठतेस... क्रिकेटपटूंना हे करण्याची गरज नाही पण तू मला शिस्तीचा खरा अर्थ समजावून सांगितला."