Join us

IPL लिलावात २०.२५ कोटी अन् वर्ल्ड कप! कमिन्सनं २०२३ गाजवलं; स्टार खेळाडूनं 'जग' जिंकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 16:14 IST

Open in App
1 / 10

२०२३ हे वर्ष संपायला अवघे दोन दिवस उरले आहेत. यंदाच्या वर्षात क्रिकेट विश्वात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या, ज्यामुळे चाहत्यांचे मनोरंजन झाले. याशिवाय वन डे विश्वचषकासारखी बहुचर्चित स्पर्धा देखील पार पडली.

2 / 10

खरं तर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने यंदाचे वर्ष गाजवले असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. कारण कांगारूंनी २०२३ या वर्षात अनेक विक्रमांना गवसणी घातली. तसेच सहाव्यांदा विश्वचषक उंचावण्याची किमया साधली.

3 / 10

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्ससाठी हे वर्ष एखाद्या चांगल्या स्वप्नासारखे राहिले. कमिन्सच्याच नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करून विश्वचषक जिंकला. सुरूवातीचे दोन सामने गमावल्यानंतर अप्रतिम कामगिरी करून कांगारूंचा संघ सहाव्यांदा विश्वविजेता बनला.

4 / 10

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. इंग्लंडच्या धरतीवर पार पडलेला हा सामना म्हणजे तमाम भारतीयांसाठी एक वाईट स्वप्नच.

5 / 10

ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 'अजिंक्य' राहण्याचा मान पटकावला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारताचा दारूण पराभव करून कांगारूंनी इतिहास रचला. भारताला सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

6 / 10

आयपीएल लिलावात पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांच्यावर विक्रमी बोली लागली. पॅट कमिन्सने विक्रम रचत २०.५० कोटींचा गल्ला जमवला. त्याला सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीने खरेदी केले.

7 / 10

पाकिस्तानविरूद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी मालिकेत देखील ऑस्ट्रेलियाने विजय संपादन केला. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा तब्बल ३६० धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने २८ वर्षांची परंपरा कायम ठेवत पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला.

8 / 10

सध्या पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तिथे तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील सलामीचे दोन्हीही सामने जिंकून यजमानांनी २-० ने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

9 / 10

पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने २०२३ हे वर्ष गाजवले. ऑस्ट्रेलियाने यंदा वन डे विश्वचषक, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना, ॲशेस मालिका आणि घरच्या मैदानावर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले.

10 / 10

पाकिस्तानविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यातील दोन्ही डावात पॅट कमिन्सने ५-५ बळी घेतले. सामन्यात १० बळी घेतलेल्या कमिन्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

टॅग्स :आॅस्ट्रेलियावन डे वर्ल्ड कपजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाआयपीएल लिलावफ्लॅशबॅक 2023