ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क शुक्रवारी अचानक दक्षिण आफ्रिका दौरा सोडून मेलबर्नसाठी रवाना झाला.
रविवारी मेलबर्न येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. तो सामना याची देही याची डोळा पाहण्यासाठी स्टार्कने आफ्रिका दौऱ्यातून माघारी परतण्याचा निर्णय घेतला.
महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघात स्टार्कच्या पत्नीचाही समावेश आहे. त्यामुळे पत्नीला चिअर करण्यासाठी स्टार्कने हा निर्णय घेतला.
एलिसा हिली असे स्टार्कच्या पत्नीचं नाव आहे आणि ती ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघात यष्टिरक्षक आहे. 2017मध्ये मिचेल आमि एलिसा यांनी लग्न केलं.
मिचेल व एलिसाच्या विवाहसोहळ्याला ऑस्ट्रेलियन संघातील अनेक खेळाडूंची उपस्थिती होती.
एलिसाचे वडील ग्रेग हे ऑस्ट्रेलियातले प्रथम श्रेणी क्रिकेटर होते. एलिसा व मिचेल नऊ वर्षांचे असताना एका क्रिकेट स्पर्धेदरम्यान एकमेकांना भेटले होते.
दोघांनीही 11 वर्षांखालील संघात यष्टिरक्षणाची जबाबदारीही सांभाळली होती. नंतर सहा वर्षे हे दोघे एकत्र खेळले.
यादरम्यान दोघांमध्येही घट्ट मैत्री निर्माण झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्या प्रेमासाठी क्लार्क रविवारी फायनल सामन्यात पत्नीचं मनोबल उंचावण्यासाठी पोहोचणार आहे.
एलिसानं 111 ट्वेंटी-20 सामन्यांत 1985 धावा केल्या आहेत. त्यात नाबाद 148 धावांची सर्वोत्तम खेळी आहे.
वन डे क्रिकेटमध्येही तिनं 73 सामन्यांत 32.11च्या सरासरीनं 1638 धावा केल्या आहेत.