Join us  

पहिल्या वन डे मध्ये ऑस्ट्रेलियाचा आरामात विजय

By admin | Published: January 12, 2016 12:00 AM

Open in App

रोहित आणि कोहली यांनी द्विशतकी (२०७ धावा) भागीदारी केली. ऑस्ट्रेलियात खेळताना भारतीय खेळाडूंनी नोंदविलेली ही सर्वोत्तम भागीदारी

भारतीय फिरकी गोलंदाज अपयशी ठरल्यामुळे ऑस्ट्रेलियाला ३१० धावांचे आव्हान सहज पार करता आले

बरिंदर सरणने पदार्पणात तीन विकेट्स घेतल्या तर अश्विनने दोघांना माघारी धाडले पण धावांना लगाम घालण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आले. भुवनेश्वर कुमार उमेश यादव आणि रविंद्र जडेजा यांना एकही विकेट मिळवता आली नाही.

१६३ बॉलमध्ये १७१ रन करणारा रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरोधात त्यांच्याच धरतीवर सर्वोच्च रन करणारा पहिला खेळाडू बनला आहे. शर्माने ३७ वर्ष जुना विवियन रिचर्ड्सचा १५३ रन्सचा रेकॉर्ड तोडला.

भारताच्या ३१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात अडखळत झाली प्रारंभीच फिंच (८) आणि वॉर्नरच्या (५) रुपाने दोन बळी मिळाल्याने भारताच्या गोटात आनंदाचे वातावरण होते.

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने या वर्षाची सुरवात धडाक्यात करताना नाबाद दीडशतकी (१७१धावा) खेळी केली.

ऑस्ट्रेलियासमोर ३१० धावांचे आव्हान उभारुन देखील भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. स्टीव्हन स्मीथ (१४९) आणि जॉर्ज बेली (११२) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर यजमानांनी भारताचे आव्हान चार चेंडू राखून गाठले.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा समाचार घेत २०७ धावांची भागीदारी रचली. दुर्देवाने विराट कोहलीचे शतक अवघ्या नऊ धावांनी हुकले. त्याने ९७ चेंडूंमध्ये ९१ धावा केल्या.