Rishabh Pant सह असे ५ विकेट किपर बॅटर ज्यांच्यावर मेगा लिलावात होईल पैशांची 'बरसात'

मेगा लिलावात कोणता फ्रँचायझी संघ कुणासाठी किती रुपये खर्च करणार?

आयपीएलच्या १८ व्या हंगामासाठी २४ आणि २५ नोव्हेंबरला मेगा लिलाव होणार आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह या शहरात होणाऱ्या लिलावात ५०० हून अधिक खेळाडूंचा समावेश आहे.

माजी क्रिकेटर, समालोचक आणि क्रिकेट समीक्षक अशी ओळख असलेल्या आकाश चोप्रा यांनी मेगा लिलावात कोणत्या ५ विकेट किपर बॅटरसाठी मोठी चढाओढ पाहायला मिळेल, यासंदर्भातील अंदाज व्यक्त केला आहे.

मेगा लिलावात कोणता फ्रँचायझी संघ कुणासाठी किती रुपये खर्च करणार या विषयाची क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येते. इथं एक नजर टाकुयात यंदाच्या मेगा लिलावात सर्वाधिक बोली लागू शकेल अशा ५ विकेट किपर बॅटर्सवर

मेगा लिलावात कोणता फ्रँचायझी संघ कुणासाठी किती रुपये खर्च करणार या विषयाची क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येते. इथं एक नजर टाकुयात यंदाच्या मेगा लिलावात सर्वाधिक बोली लागू शकेल अशा ५ विकेट किपर बॅटर्सवर

जोस बटरलर हा विकेट किपर बॅटरशिवाय कॅप्टन्सीचा एक उत्तम पर्याय ठरू शकतो, असे सांगत आकाश चोप्रा यांनी या खेळाडूवर ८-१० कोटी रुपयांची बोली लागेल, असे म्हटले आहे.

या यादी चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा विकेट किपर बॅटर फिल सॉल्टचा नंबर लागतो. स्फोटक फलंदाजीनं मॅचला कलाटणी देण्याची क्षमता असणाऱ्या या खेळाडूसाठीही फ्रँचायझी संघ मोठी बोली लावताना पाहायला मिळू शकते.

लोकेश राहुल हा मार्की प्लेयर्सच्या यादीत सर्वात आघाडीवर असेल. त्याच्यासाठीही मोठी बोली लागू शकेल, असा अंदाज आकाश चोप्रा यांनी वर्तवल्याय. LSG ची १८ कोटींची ऑफर नाकारल्यावर त्याला याच्यापेक्षा अधिक रक्कम मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल.

भारतीय संघाबाहेर असणारा ईशान किशन हा देखील महागड्या विकेट किपर बॅटरच्या यादीत आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. तो पुन्हा MI च्या ताफ्यात दिसणार की, अन्य फ्रँचायझी संघ त्याला आपल्या ताफ्यात घेणार ते पाहण्याजोगे असेल.

रिषभ पंत हा सर्वात भाव मिळणारा विकेट किपर बॅटर ठरू शकतो, असे आकाश चोप्रांनी म्हटलं आहे. त्याच्यावर लागणारी बोली ही आयपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडूचा प्राइज टॅग ठरणार का? याचीही उत्सुकता क्रिकेट वर्तुळामध्ये निश्चितच असेल.