Join us  

Babar Azam, PAK vs AUS : बाबर आजमने मोडला पंतप्रधान Imran Khan यांचा मोठा विक्रम; पाकिस्तानी संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वविक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 12:26 PM

Open in App
1 / 8

PAK vs AUS : पाकिस्तानी संघाने गुरुवारी ऐतिहासिक कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात पाकिस्तानने अशक्य वाटणारा विजय मिळवला. इमाम-उल-हक व कर्णधार बाबर आजम यांनी शतकी खेळी साकरताना हा विश्वविक्रमी विजय मिळवून दिला. बाबरने याही सामन्यात मोठमोठे विक्रम मोडले.

2 / 8

कर्णधार आरोन फिंच ( ०) याला लगेच बाद केल्यानंतर शाहिन शाह आफ्रिदीने आनंद व्यक्त केला, पण त्यानंतर मागच्या सामन्यातील शतकवीर ट्रॅव्हीस हेड व बेन मॅकडेर्मोट यांनी ईंगा दाखवला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी केली. हेड ७० चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ८९ धावा करून बाद झाला.

3 / 8

तीन वन डे सामन्यांचा अनुभव असलेला बेन पाकिस्तानी गोलंदाजांसमोर शड्डू ठोकून उभा राहिला. त्याने १०८ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह १०४ धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो १००० वा पुरुष क्रिकेटपटू ठरला.

4 / 8

त्यानंतर मार्नस लाबुशेन व मार्कस स्टॉयनिस यांनी फटकेबाजी केली. लाबुशेन ४९ चेंडूंत ५९ धावांवर बाद झाला, तर स्टॉयनिसने ३३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४९ धावा चोपल्या. सीन अबॉटने १६ चेंडूंत २८ धावा कुटल्या आणि ऑस्ट्रेलियाने ८ बाद ३४८ धावांचा डोंगर उभा केला.

5 / 8

प्रत्युत्तरात फखर जमान ( ६७) व इमाम-उल-हक यांनी पहिल्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी करून पाकिस्तानसाठी मजबूत पाया रचला. त्यानंतर इमाम व बाबर ही जोडी तुफान खेळली. या दोघांनी शतकी खेळी केली. इमाम ९७ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह १०६ धावांवर माघारी परतला.

6 / 8

बाबरने ८३ चेंडूंत ११४ धावांची खेळी केली, त्यात ११ चौकार व १ षटकाराचा समावेश होता. पाकिस्तानचा कर्णधार म्हणून त्याचे हे चौथे शतक ठरले आणि अझर अली ( ३) चा विक्रम त्याने मोडला.

7 / 8

वन डे क्रिकेट इतिहासात सर्वात कमी ८३ डावांमध्ये १५ शतक झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. त्याने हाशिम आमला ( ८६ डाव), विराट कोहली ( १०६) व डेव्हिड वॉर्नर ( १०८) यांना मागे टाकले.

8 / 8

पाकिस्तानने ४९ षटकांत ४ बाद ३४९ धावा करून विजय निश्चित केला व मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. वन डे क्रिकेटमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची पाकिस्तानची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी २०१४ मध्ये त्यांनी बांगलादेशचे ३२९ धावांचे लक्ष्य पार केले होते.

टॅग्स :बाबर आजमपाकिस्तानआॅस्ट्रेलिया
Open in App