Join us  

Babar Azam, Zimbabwe vs Pakistan: "आता आम्ही एकच गोष्ट करू शकतो..."; झिम्बाब्वेने हरवल्यानंतर पाकिस्तानचा बाबर आझम हताश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 9:01 PM

Open in App
1 / 6

Babar Azam, Zimbabwe vs Pakistan: भारताने T20 World Cup 2022 मध्ये पराभवाचा धक्का दिल्यानंतर पाठोपाठ आज पाकिस्तानच्या संघाला झिम्बाब्वेकडूनही पराभवाचा धक्का बसला. कमी धावसंख्येच्या अटीतटीच्या लढतीत झिम्बाब्वेच्या संघाने पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर अवघ्या १ धावेने धूळ चारली.

2 / 6

झिम्बाब्वेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १३० धावा केल्या. सीन विल्यम्सने त्यांच्याकडून ३१ धावांची सर्वोत्तम खेळी केली. हे आव्हान अतिशय माफक असूनही पाकिस्तानच्या संघाची आव्हानाचा पाठलाग करताना दमछाक झाली. सिकंदर रजाने ३ गडी टिपत सर्वोत्तम कामगिरी केली.

3 / 6

झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची शिस्तबद्ध कामगिरी आणि पाकच्या वरच्या फळीतील फलंदाजांची हाराकिरीच्या यामुळे अखेरच्या चेंडूवर त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने प्रतिक्रिया दिली.

4 / 6

'आमच्या संघाची कामगिरी खूपच निराशाजनक झाली. फलंदाजीच्या बाबतीत आमची कामगिरी फारच वाईट झाली. पहिल्या सहा षटकांमध्ये आमच्या फलंदाजांनी अतिशय खराब बॅटिंग केली. त्यानंतर शादाब आणि शान मसूद या दोघांनी दमदार कमबॅक केला. त्यांच्याच झालेली भागीदारी अतिशय फायद्याची होती. पण दुर्दैवाने शादाब बाद झाला, आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक विकेट्स पडतच गेल्या. त्यामुळे आमच्या संघावर प्रचंड दडपण आले.'

5 / 6

'गोलंदाजीत आम्ही नव्या चेंडूचा योग्य वापर करु शकलो नाही. पण नंतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून सामना आमच्या आवाक्यात आणला. पण अखेर आम्ही हरलो.'

6 / 6

'आता आम्ही एकच गोष्ट करू शकतो... आम्हाला एकत्र बसून चर्चा करावी लागेल. आमच्या चुकांमधून आता आम्हाला शिकावे लागेल. आम्ही पुढच्या सामन्यात नक्कीच दमदार पुनरागमन करू,' अशा शब्दांत बाबर आझमने आपल्या कबुली दिली.'

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानझिम्बाब्वेबाबर आजम
Open in App