Join us  

Babar Azam surpassed Virat Kohli : बाबर आजमने आधी Virat Kohli चा विक्रम मोडला नंतर वर्ल्ड रेकॉर्ड केला अन् मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार दुसऱ्यालाच दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 4:33 PM

Open in App
1 / 8

Babar Azam surpassed Virat Kohli : पाकिस्तान संघाने पहिल्या वन डे सामन्यात घरच्या मैदानावर बुधवारी वेस्ट इंडिजवर ५ विकेट्स व ४ चेंडू राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या ८ बाद ३०५ धावांचा पाकिस्तानने ४९.२ षटकांत ५ बाद ३०६ धावा करून यशस्वी पाठलाग केला. विंडीजच्या शे होपच्या शतकाला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याने शतकी खेळी करून उत्तर दिले.

2 / 8

शे होपने १२७ धावांची खेळी करताना विंडीजला त्रिशतकी मजल मारून दिली. वन डेत कमी डावांत 4000 धावा करणाऱ्या फलंदाजांत होप संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहे. हाशिम आमलाने सर्वात कमी 81 डावांत 4000 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर बाबर आजम ( 82), रिचर्ड (88) व होप ( 88) यांचा क्रमांक येतो. जो रूट ( 91) व विराट कोहली ( 93) चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत.

3 / 8

विंडीजकडून शामार्ह ब्रुक्सने ७०, रोव्हमन पॉवेलने ३२, रोमारिओ शेफर्डने २५ आणि कर्णधार निकोलस पूरनने २१ धावांचे योगदान दिले. हॅरीस रौफने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. शाहिन शाह आफ्रिदीने दोन, तर मोहम्मन नवाज व शादाब खान यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.

4 / 8

प्रत्युत्तरात बाबर आजम व इमाम उल हक यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. इमाम ६५ धावांवर बाद झाल्यानंतर बाबर व मोहम्मद रिझवान यांनी दमदार खेळ केला. रिझवानने ५९ धावा केल्या, तर त्यानंतर आलेल्या खुशदील शाहने २३ चेंडूंत नाबाद ४१ धावा चोपल्या.

5 / 8

बाबरने १०७ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने १०३ धावा केल्या आणि वन डे क्रिकेटमधील हे त्याचे १७वे शतक ठरले. त्याने सलग तिसऱ्या वन डे सामन्यात शतकी खेळी करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. दोन वेळा सलग तीन शतकं झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला.

6 / 8

त्याने वन डे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद १००० धावा पूर्ण करण्याचा विराट कोहलीचा विक्रमही मोडला. विराटने १७ डावांमध्ये १००० धावा केल्या होत्या, तर बाबरला केवळ १३ डाव खेळावे लागले.

7 / 8

8 / 8

त्याने वन डे क्रिकेटमध्ये सरासरीच्या बाबतीतही विराटला मागे टाकले. बाबरची वन डे तील सरासरी ही ६०.३१ अशी आहे. या सामन्यानंतर बाबरला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जाहीर झाला, परंतु तो त्याने खुशदील शाहला दिला. त्याची ही कृती सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

टॅग्स :बाबर आजमपाकिस्तानवेस्ट इंडिजविराट कोहली
Open in App