पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम कायम विविध कारणांमुळे चर्चेत असतो. बाबर आझमची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बऱ्याच काळापासून खराब कामगिरी सुरू आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही अपयशी ठरला आहे. बाबर आझमकडे आता स्वत:चा फॉर्म परत मिळवण्याची आणखी एक संधी आहे.
लवकरच पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत पाकिस्तान बाबर आझम खेळताना दिसणार आहे. पण या स्पर्धेपूर्वी बाबर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
PSLच्या कराची किंग्ज संघाचे मालक सलमान इक्बाल यांनी एक मोठा खुलासा केला आहे. PSL सुरू असताना बाबर रात्री हॉटेलमधून बाहेर पडायचा, असे त्यांनी सांगितले.
सलमान इक्बाल यांनी मुलाखतीत बोलताना सांगितले, 'बाबर आझम स्टार क्रिकेटर आहे. तो रात्री उशिरा टीम हॉटेलमधून बाहेर पडायचा. त्याला कोणीही अडवत नव्हते.'
'तो इतर खेळाडूंनाही सोबत घेऊन जात असे. आझमला टपरीवरचे किंवा बाहेरचे पदार्थ खाण्याची खूप आवड आहे. त्यामुळे आम्ही बाबरला कराही खाण्यापासून कधीच रोखले नाही.'
'कराही हा लाहोरचा एक प्रसिद्ध पदार्थ आहे, पाकिस्तानात लोक मोठ्या आवडीने खातात. त्यामुळे जेव्हा जेव्हा बाबरला ही डिश खायची होती, तेव्हा आम्ही त्याला ती देत होतो.'