Mehidy Hasan Miraz चा खास पराक्रम; जड्डूसह बेन स्टोक्सच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री

बांगलादेशच्या खेळाडूची कमाल; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या एका हंगामात अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा खेळाडू

बांगलादेशचा संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात व्यग्र आहे. या मालिकेतील पहिला सामना ढाकाच्या मैदानात खेळवण्यात येत आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात मेहदी हसन मिराझ याने खास विक्रमाला गवसणी घातली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील (WTC) यंदाच्या हंगामात त्याने बॅटिंग आणि बॉलिंगसह त्याने खास छाप सोडलीये.

अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्याने आता बेन स्टोक्स आणि रवींद्र जडेजा यांच्या खास क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे.

WTC च्या आतापर्यंतच्या इतिहासात एका चक्रात किंवा एका हंगामात ५०० धावा आणि ३० विकेट्स असा पराक्रम करून दाखवणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे.

या यादीत इंग्लंडचा बेन स्टोक्स सर्वातआघाडीवर आहे. २०१९-२१ च्या WTC हंगामात या अष्टपैलू खेळाडूनं १३३४ धावांसह ३४ विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवला होता.

भारतीय संघातील अष्टपैलू रवींद्र जडेजा याने २०२१-२३ च्या हंगामात ७४१ धावांसह ४७ विकेट्स घेतल्या होत्या.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या २०२१-२३ च्या हंगामात बेन स्टोक्सनं ९७१ धावांसह ३० विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्याचे पाहायला मिळाले होते.

WTC स्पर्धेतील यंदाच्या २०२३-२५ हंगामात बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजयाने ५१२ धावांसह ३४ विकेट्स घेतल्या आहेत.