Join us

BANW vs INDW: बांगलादेशात भारतीय महिला संघाचं जंगी स्वागत; ट्वेंटी-२० मालिकेचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 17:04 IST

Open in App
1 / 7

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून तिथे पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ मंगळवारी बांगलादेशच्या धरतीवर दाखल झाला.

2 / 7

भारतीय संघातील शिलेदारांचे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्वागत केले, ज्याची झलक त्यांनी शेअर केली आहे. २८ एप्रिलपासून या मालिकेला सुरुवात होईल.

3 / 7

२८ एप्रिल ते ९ मे या कालावधीत ही मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संघ २३ एप्रिलला बांगलादेशात पोहोचला. तर १० मेला भारताकडे रवाना होईल. मालिकेतील सर्व सामने सिल्हेट येथे खेळवले जाणार आहेत.

4 / 7

टीम इंडिया बांगलादेशमध्ये पोहोचली आहे. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या खेळीवर सर्वांची नजर असणार आहे. मागील वेळी भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आला होता तेव्हा अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या.

5 / 7

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला वादग्रस्त निर्णयावर बाद देण्यात आल्याने वाद झाला होता. हरमनने संताप व्यक्त करत सामन्यानंतर बोलताना तिखट प्रतिक्रिया दिली होती.

6 / 7

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, डी. हेमलता, साजना सजीवन, रिचा घोष, यास्तिका भाटिया, राधा यादव, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, अमनजोत कौर, श्रेयांका पाटील, साइका इशाक, आशा शोभना, रेणुका सिंग आणि तितास साधू,

7 / 7

१) २८ एप्रिल - पहिला सामना, २) ३० एप्रिल - दुसरा सामना, ३) २ मे - तिसरा सामना, ४) ६ मे - चौथा सामना आणि ५) ९ मे - पाचवा सामना (सर्व सामने सिल्हेट येथे खेळवले जातील.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशभारतीय महिला क्रिकेट संघटी-20 क्रिकेटहरनमप्रीत कौरस्मृती मानधना