BCCI Central Contract : या ५ क्रिकेटर्संना BCCI कडून पहिल्यांदाच मिळणार पगार

यातील दोन खेळाडूंनना टीम इंडियाला चॅम्पियन करण्यातही उचलला होता मोलाचा वाटा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतीच केंद्रीय करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली. १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीसाठी करारबद्ध यादीत पाच क्रिकेटर्सं असे आहेत ज्यांना पहिल्यांदाच या यादीत स्थान मिळाले आहे. हे पाचही खेळाड क श्रेणीत असून त्यांना बीसीसीआयकडून प्रत्येकी १-१ कोटीचं वार्षिक पॅकेज मिळेल.

मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीच्या नावाचा बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

टीम इंडियाकडून टी-२० पदार्पण केल्यावर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून त्याने वनडेत पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले होते. संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला होता.

टीम इंडियाकडून तिन्ही फॉर्मेटमध्ये धमाक्यात पदार्पण करणाऱ्या हर्षित राणालाही आता बीसीसीआयकडून पगार मिळणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आपली खास छाप सोडणाऱ्या हर्षित राणाने कसोटी, वनडे आणि टी-२० तिन्ही प्रकारात पदार्पणाच्या सामन्यात त्याने ३ विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवला होता.

अभिषेक शर्मा यालाही पहिल्यांदाच बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले आहे.

आतापर्यंत १७ टी-२० सामन्यात त्याने २ शतके आणि २ अर्धशतकांच्या मदतीने ५३५ धावा काढल्या आहेत.

नितीश कुमार रेड्डी याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दिमाखदार कामगिरी करून दाखवली होती. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील लक्षवेधी कामगिरीचं मोठ बक्षीस त्याला मिळालं आहे.

नितीश कुमार रेड्डीनं ५ कसोटी सामन्यासह टीम इंडियाकडून ४ टी-२० सामने खेळला आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर आकाश दीप याला कसोटी संघात स्थान देण्यात आले. ७ कसोटी सामन्यात १५ विकेट्स घेत त्याने आपली छाप सोडली अन् आता बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने चिवट बॅटिंग करत फॉलोऑन टाळत आपल्या बॅटिंगमधील धमकही दाखवली होती.