Join us

सचिन-सेहवाग पुन्हा मैदानात? BCCI पुढाकार घेण्याची शक्यता; माजी खेळाडूंची मोठी मागणी, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 16:30 IST

Open in App
1 / 9

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू पुन्हा एकदा मैदानात दिसण्याची चिन्हं आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) त्यांच्यासाठी खास लीगचे आयोजन करणार असल्याचे कळते.

2 / 9

निवृत्त खेळाडू या लीगच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येतील. लीजेंड्स प्रीमियम लीग असे नाव या लीगला दिले जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, काही माजी भारतीय क्रिकेटपटूंनी याबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याशी चर्चा केली आहे.

3 / 9

बीसीसीआय पुढील वर्षापासून ही लीग सुरू करण्याचा विचार करत आहे. सध्या बीसीसीआय आयपीएल आणि महिला प्रीमिअर लीग या दोन लीग आयोजित करते.

4 / 9

जगभरात लीजेंड्स लीग मोठ्या प्रमाणात खेळवल्या जातात. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज, लीजेंड्स लीग क्रिकेट, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स आणि ग्लोबल लीजेंड्स लीगचे आयोजन केले जाते. यात आता भर पडण्याची शक्यता आहे.

5 / 9

बीसीसीआयने लीग सुरू केल्यास, ही कोणत्याही क्रिकेट बोर्डाने आयोजित केलेली पहिलीच लीजेंड्स लीग असेल. सध्या होत असलेल्या सर्व लीग खासगी आहेत.

6 / 9

सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्ससारखे खेळाडू नव्या लीगमध्ये खेळताना दिसू शकतात. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या पहिल्या दोन पर्वांमध्ये सचिन तेंडुलकरने इंडिया लीजेंड्सला विजय मिळवून दिला. तर युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अलीकडेच इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सची ट्रॉफी जिंकली.

7 / 9

माहितीनुसार, बीसीसीआयने लीजेंड्स लीग सुरू केली तर याचे सामने भारतातील विविध शहरांमध्ये खेळवले जातील. आयपीएलप्रमाणे या स्पर्धेचे नियोजन असेल.

8 / 9

सर्व संघ शहरांवर आधारित असतील. फ्रँचायझींचे वेगवेगळे मालक असतील. आयपीएल आणि डब्ल्यूपीएलप्रमाणे लिलाव प्रक्रिया होईल आणि फ्रँचायझी खेळाडूंवर बोली लावतील.

9 / 9

विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे खेळाडू सध्या या लीगमध्ये खेळू शकणार नाहीत कारण ते वन डे आणि कसोटी खेळत आहेत. ही लीग फक्त अशाच क्रिकेटपटूंसाठी असेल ज्यांनी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.

टॅग्स :बीसीसीआयजय शाहटी-20 क्रिकेट