Join us  

IPL 2023 : आयपीएलमध्ये आता ‘IMPACT PLAYER’ संकल्पना, १२ वा खेळाडूही उतरणार मैदानावर; जाणून घ्या नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 10:35 AM

Open in App
1 / 8

‘IMPACT PLAYER’ concept in IPL 2023 - इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मध्ये दोन नवीन संघ दाखल झाल्यामुळे जेतेपदासाठीची चुरस अधिक रंजक झालेली पाहायला मिळाली. गुजरात टायटन्सने पहिल्याच प्रयत्नात जेतेपद पटकावले आणि आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली IPL 2023 मध्ये जेतेपद कायम राखण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.

2 / 8

१० संघामुळे BCCI ने आयपीएल २०२३चा कालावधी दोन महिन्यांवरून अडीच महिने करण्याचा निर्णय घेतलाय आणि ICC नेही त्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विंडो उपलब्ध करून दिली आहे. त्यात आता आयपीएलमध्ये नवी नियम आणण्याची तयारी बीसीसीआयने सुरू केली आहे. फुटबॉल, रग्बी, बास्केटबॉल, कबड्डी आदी खेळांमध्ये जसे राखीव खेळाडू मैदानावर खेळू शकतात तसाच हा नियम असणार आहे आणि ‘IMPACT PLAYER’ असे त्याला नाव दिले गेले आहे.

3 / 8

इंडियन प्रीमिअर लीग २०२३च्या आधी एक मिनी ऑक्शन होणार आहे आणि त्यात पुन्हा एकदा काही संघात बदल पाहायला मिळणार आहेत. रॉबिन उथप्पा व सुरेश रैना यांनी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्याने चेन्नई सुपर किंग्सची अडचण झाली आहे. CSK रवींद्र जडेजाचा रिप्लेसमेंट म्हणून रैनाला घेतील अशी अपेक्षा होती. त्यात उथप्पानेही निवृत्ती जाहीर केल्याने CSK ला चांगले खेळाडू घ्यावे लागतील. जडेजा नाराज असल्याने तो CSK ला सोडचिठ्ठी देईल अशी चर्चा सुरू आहे.

4 / 8

CSK प्रमाणे इतर संघातही बदल दिसतील. त्यात BCCI चा हा नवा प्रयोग फ्रँचायझींना खेळाडूची निवड करताना फार विचार करायला लावणारा असेल. आयपीएलमध्ये ‘IMPACT PLAYER’ ही संकल्पना अस्तित्वात आणण्याआधी त्याची चाचपणी ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार्या सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० चषक स्पर्धेत होणार आहे.

5 / 8

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर या नियमानुसार संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हमधील एका खेळाडूच्या जागी दुसऱ्या खेळाडूला मैदानावर उतरवू शकतो.

6 / 8

फुटबॉल, बास्केटबॉल, रग्बी आदी खेळांमध्ये हा नियम अस्तित्वात आहे आणि त्यातूनच प्रेरणा घेत बीसीसीआयने आयपीएलमध्ये हा नियम आणण्याची तयारी दर्शवली आहे.

7 / 8

डावातील १४ वे षटक पूर्ण होण्यापूर्वी संघाला हा बारावा खेळाडू मैदानावर उतरवावा लागेल. त्यानंतर हा खेळाडू फलंदाजीही करू शकतो आणि ४ षटकंही फेकू शकतो. मैदानावरील अम्पायर्सना त्या खेळाडूच्या समावेशाबाबत सांगणे गरजेचे आहे

8 / 8

ज्या खेळाडूच्या जागी ‘IMPACT PLAYER’ ला संधी दिली जाईल, तो खेळाडू या सामन्यातून बाद होईल. नाणेफेक करताना कर्णधारांना प्लेइंग इलेव्हनसोबतच Impact Player साठी चार पर्यायी खेळाडूंची नावंही सांगावी लागणार आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२२बीसीसीआय
Open in App