VIVOकडे IPL 2021चं टायटल स्पॉन्सरशीप; चायनीझ कंपनीसाठी BCCIनं उघडलं दार!

भारत-चीन यांच्यातील राजकिय तणावावर VIVOचे पुनरागमन अवलंबून आहे.

त्यानुसार १३९ खेळाडूंना रिटेन करण्यात आले आहे, तर ५७ खेळाडूंना रिलीज करण्यात आले आहे. रिलीज केलेल्या खेळाडूंत स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, उमेश यादव अशी काही मोठी नावंही आहेत. त्यामुळे १८ फेब्रुवारीला चेन्नईत होणाऱ्या IPL Auction 2021कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BCCIनं आर्थिक गणितांकडेही मोर्चा वळवला आहे. त्यामुळे स्पॉन्सर मिळवण्याच्या प्रयत्नांनाही वेग आला आहे. त्यातच यावेळी टायटल स्पॉन्सर कोण असेल, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गतवर्षी चायनीझ वस्तूंवरील बहिष्काराची मागणी लक्षात घेता BCCIनं VIVOला माघार घेण्यास सांगितली होती आणि Dream 11नं यूएईत झालेल्या आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले होते. पण, २०२१मध्ये पुन्हा VIVOच टायटल स्पॉन्सर असणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

चायनीझ कंपनी VIVOनं २०१८मध्ये प्रती वर्ष ४४० कोटी यानुसार पाच वर्षांकरीता आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले होते.

भारत-चीन सीमेवर झालेल्या हाणामारीनंतर चायनीझ कंपन्यांवर बहिष्काराची मागणी वाढली. त्यामुळे २०२०च्या टायटल स्पॉन्सरशीपमधून VIVOनं माघार घेतली. Dream 11नं २२२ कोटींमध्ये २०२०चं टायटल स्पॉन्सरशीप मिळवली.

क्रिकबझनं दिलेल्या वृत्तानुसार IPL 2021चे टायटल स्पॉन्सरशीप हक्क VIVOला मिळणार असून BCCIनं तशी तयारी दर्शवली आहे. BCCIनं Dream 11ला मोठी बोली लावण्याची संधी दिली होती, परंतु त्यांनी नकार दिला.

सद्यस्थितीत BCCI अजूनही स्पॉन्सरच्या शोधात आहेत आणि त्यामुळेच ऑक्शन उशीरानं होत आहे. ऑक्शन हे कोणत्याही टायटल स्पॉन्सरशिवाय होणार आहे.

भारत-चीन यांच्यातील राजकिय तणावावर VIVOचे पुनरागमन अवलंबून आहे.