Cricket Buzz»फोटो गॅलरी »...अन् BCCI चे सर्वत्र कौतुक झाले; सचिव Jay Shah यांचे ते चार मोठे निर्णय, वाचा सविस्तर...अन् BCCI चे सर्वत्र कौतुक झाले; सचिव Jay Shah यांचे ते चार मोठे निर्णय, वाचा सविस्तर By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 1:55 PMOpen in App1 / 8ट्वेंटी-२० विश्वचषक विजेत्या टीम इंडियाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) तब्बल १२५ कोटी रूपयांचे बक्षीस दिले. तेव्हापासून बीसीसीआय सातत्याने क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधत आहे.2 / 8बीसीसीआयने मागील काही दिवसांमध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे बोर्डाप्रती चाहत्यांचा आदर वाढल्याचे दिसते. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी नुकताच एक मोठा निर्णय घेत माजी खेळाडू अंशुमन गायकवाड यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत म्हणून एक कोटी रूपये देणार असल्याचे सांगितले.3 / 8भारताचे माजी कर्णधार अंशुमन गायकवाड हे मोठ्या कालावधीपासून ब्लंड कॅन्सरशी झुंज देत आहेत. लंडन येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कपिल देव यांनी यासाठी आवाज उठवला होता.4 / 8बीसीसीआयने विश्वविजेत्या आपल्या संघाला १२५ कोटी रूपयांचे बक्षीस दिले. भारताने बार्बाडोसच्या धरतीवर दक्षिण आफ्रिकेला नमवून ट्वेंटी-२० विश्वचषकाचा किताब जिंकला. बीसीसीआयचा कारभार पाहणारे जय शाह जेव्हापासून बोर्डाचे सचिव झाले आहेत तेव्हापासून ते चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. 5 / 8बीसीसीआयने बार्बाडोसहून भारतीय संघाला मायदेशात आणण्यासाठी एक स्पेशल विमान पाठवले. तिथे मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ असल्याने टीम इंडियाला भारतात पोहोचण्यास वेळ लागला. 6 / 8भारतीय क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाचे खेळाडू आणि त्यांचे कुटुंबीय तसेच बार्बाडोसमध्ये अडकलेल्या भारतीय मीडियाच्या प्रतिनिधींना विमानाने आणण्याचा निर्णय घेतला. 7 / 8बीसीसीआयने पाठवलेल्या या विमानाने थेट बार्बाडोस गाठले. यानंतर टीम इंडिया थेट दिल्लीत दाखल झाली. स्पेशल फ्लाइटमुळे टीम इंडियाशी संबंधित प्रत्येकजण सुखरूप परत येऊ शकला.8 / 8खरे तर बार्बाडोसमधील विमानतळ भीषण वादळामुळे बंद करण्यात आले होते. बीसीसीआयने खेळाडूंसह माध्यमांच्या प्रतिनिधींना केलेली मदत, माजी खेळाडूच्या उपचारासाठी उचललेले पाऊल, विश्वविजेत्या संघावर कोट्यवधींचा वर्षाव याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications