WTC Final पराभवामुळे टीम इंडियाचा 'भाव' घसरला? १०० कोटी कमी करुनही मिळेना स्पॉन्सर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (BCCI) प्रचंड दबाव आहे. आयपीएल मीडिया राइट्समधून आणि मीडिया राइट्सकडून BCCI ने भरपूर पैसा कमावला आहे. पण, आयसीसीच्या ट्रॉफी जिंकता न आल्यामुळे बीसीसीआयला स्पॉन्सर मिळणे अवघड झाले आहे.

Byju's, PayTM नंतर MPLनेही स्पॉन्सरशीपची डिल रद्द केली आणि त्यांना किंमत कमी करूनही नवा स्पॉन्सर मिळेनासा झालाय. BCCIने भारतीय क्रिकेट संघाच्या प्रायोजकाची मूळ किंमत ३५० कोटी रुपये ठेवली आहे. Byjuने मागील कार्यकाळासाठी सुमारे २८७ कोटी रुपये दिले, त्यानंतर सुमारे ४५० कोटी रुपये देऊन कंपनीने नंतर हा करार २०२३ पर्यंत वाढवला.

इकॉनॉमिक टाईम्समधील वृत्तानुसार, बीसीसीआयने भारतासोबत होणाऱ्या द्विपक्षीय सामन्यांसाठी प्रत्येक सामन्यासाठी ३ कोटी रुपये आधारभूत किंमत निश्चित केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) टूर्नामेंटसाठी प्रत्येक सामन्याची मूळ किंमत १ कोटी रुपये आहे.

तथापि, २०१८ मध्ये प्रायोजकत्व अधिकार सुरक्षित करण्यासाठी Byju ने BCCI ला जेवढे पैसे दिले, त्या तुलनेत मूळ किमतीत मोठी घसरण केली आहे. Byju ने भारतात प्रति सामना रु ५.०७ कोटी आणि प्रति सामना रु १.५६ कोटी दिले. मात्र, बाजारातील मंदी लक्षात घेता हा बदल आहे.

“BCCI ने लीड प्रायोजक अधिकारांसाठी वास्तववादी आधारभूत किंमत निश्चित केली आहे. मार्केटची स्थिती गंभीर आहे. आणि नवीन प्रायोजक जे क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत होते, त्यांनी निधीच्या तुटवड्यामुळे त्यांच्या मार्केटिंग बजेटमध्ये मोठी कपात केली आहे,” असे इकॉनॉमिक टाईम्सने एका सूत्राच्या हवाले म्हटले आहे.

BCCIने १४ जून रोजी जर्सी प्रायोजकत्वासाठी निविदा प्रसिद्ध केली. निविदा दस्तऐवज २६ जून २०२३ पर्यंत खरेदीसाठी उपलब्ध आहे. BCCI ने अलीकडेच २५० कोटी रुपयांच्या करारासह Adidas ला किट प्रायोजक म्हणून ऑनबोर्ड घेतले. Adidas पाच वर्षांसाठी प्रत्येक सामन्यासाठी ७५ लाख रुपये देणार आहे. बीसीसीआयला मर्चेंडाइझिंगवर रॉयल्टी म्हणून प्रति वर्ष १० कोटी रुपये मिळणार आहेत.