Join us  

B'Day Spcl: भारताच्या 'या' गोलंदाजाने केलं होतं साडेसात रुपयांत लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 10:52 AM

Open in App
1 / 5

150 च्या गतीने गोलंदाजी करणाऱ्या भारताच्या वरुण अॅरोनचा आज वाढदिवस. 29 ऑक्टोबर 1989 मध्ये वरुणचा जन्म झाला आहे.

2 / 5

वरुण बराच काळ भारतीय संघापासून दूर आहे. परंतु त्याच्या जीवनाची कथा खूपच रंजक आहे. त्याने लहानपणीची मैत्रीण रागिनी सिंहसह अवघ्या साडेसात रुपयांत विवाह केला. वरुण व रागिनी यांनी जमशेदपूरच्या न्यायालयात लग्न केले.

3 / 5

दोघेही एकाच शाळेत शिकत होते. रागिनीचे कुटुंब जमशेदपूरचेच होते. एका सेलेब्रिटीचे लग्न इतक्या साध्या पद्धतीने होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

4 / 5

2016 साली न्यायालयात लग्न केल्यानंतर दोघांनी काही दिवसांनंतर चर्चमध्ये पारंपरिक पद्धतीने पुन्हा लग्न केले. 2001 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वरुणने 2014 मध्ये शेवटचा वन डे आणि 2015 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला आहे.

5 / 5

कारकिर्दीत त्याने नऊ कसोटी आणि नऊ वन डे सामने खेळले आहेत. सततच्या दुखापतीमुळे त्याला संघात स्थान पक्के करता आले नाही.

टॅग्स :बीसीसीआय