Join us

#Best Of 2018 : कसोटीत भारतीय गोलंदाजांचा दबदबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 17:48 IST

Open in App
1 / 11

भारतीय संघाला परदेश दौऱ्यात कसोटी मालिकेत अपयशाचा सामना करावा लागला असला तरी गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. 2018मध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या अव्वल 10 गोलंदाजांत भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. अकराव्या स्थानावर असलेला फिरकीपटू आर अश्विन 38 विकेटसह संयुक्तपणे दहाव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांत विकेट घेऊन तो अव्वल दहात येऊ शकतो. 2018 मध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक विकेट घेणारे दहा गोलंदाज कोण, चला पाहूया...

2 / 11

श्रीलंकेचा दिलरुवन परेरा 2018 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याने 10 सामन्यांत 48 विकेट घेतल्या आहेत. त्यात तीन वेळा पाच विकेट आणि एक वेळा दहा विकेट घेण्याचा पराक्रम त्याने केला आहे.

3 / 11

ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनच्या नावावर 9 सामन्यांत 48 विकेट आहेत आणि भारताविरुद्धच्या मालिकेत त्याची गोलंदाजी चांगलीच कमाल करत आहे.

4 / 11

दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा 9 सामन्यांत 46 विकेटसह तिसऱ्या स्थानावर आहे.

5 / 11

भारताचा मोहम्मद शमी 11 सामन्यांत 44 विकेटसह चौथ्या स्थानावर आहे.

6 / 11

इंग्लंडच्या जेम्स अँडरसनच्या नावावर 12 सामन्यांत 43 विकेट आहेत

7 / 11

बांगलादेशच्या तैजुल इस्लामने अवघ्या 7 सामन्यांत 43 विकेट घेतल्या आहेत

8 / 11

बांगलादेशच्या मेहदी हसन मिराझच्या नावावर 8 सामन्यांत 41 विकेट आहेत

9 / 11

भारताचा जसप्रीत बुमरा ( 8 सामने 39 विकेट)

10 / 11

पाकिस्तानचा मोहम्मद अब्बास ( 7 सामने 38 विकेट)

11 / 11

भारताचा इशांत शर्मा ( 10 सामने 38 विकेट)

टॅग्स :बेस्ट ऑफ 2018जसप्रित बुमराहइशांत शर्मामोहम्मद शामी