Join us  

टीम इंडियाच्या या स्टार फलंदाजाच्या पत्नीच्या सौंदर्यासमोर मोठमोठ्या अभिनेत्री फेल, पाहा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 10:14 PM

Open in App
1 / 6

धडाकेबाज फलंदाज मनीष पांडे गेल्या काही काळापासून भारतीय संघात स्थान मिळवू शकलेला नाही. मात्र तो पर्सनल लाईफमुळे नेहमी चर्चेत असतो. त्याने दक्षिण भारतीय अभिनेत्रीसोबत विवाह केला आहे.

2 / 6

भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडेने २ डिसेंबर २०१९ रोजी दक्षिण भारतीय अभिनेत्री आश्रिता शेट्टी हिच्यासोबत विवाह केला होता. आश्रिता शेट्टी दक्षिण भारतीय सिनेमांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

3 / 6

मनीष पांडे आणि आश्रिता शेट्टी यांनी एकमेकांना बरीच वर्षं डेट केलं होतं. बरीच वर्ष चाललेल्या रिलेशनशिपनंतर दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला होता.

4 / 6

मनीष पांडेची पत्नी आश्रिता शेट्टी २०१० मध्ये क्लीन अँड क्लीअर फ्रेश फेस ब्युटी कॉन्टेस्टमधील विजेती राहिलेली आहे.

5 / 6

आश्रिता शेट्टीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात उदयम एनएच ४ मधून केली होती. आश्रिता शेट्टीने इंद्रजित, ओरू कन्नयम मुनू कलावानिकलम सारख्या चित्रपटामधून काम केलं आहे. आश्रिता शेट्टी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

6 / 6

मनीष पांडेने टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना श्रीलंकेविरुद्ध २३ जुलै २०२१ रोजी खेळला होता. त्याने आतापर्यंत भारतीय संघाकडून २९ वनडे आणि ३९ टी-२० सामने खेळले होते. मनीष पांडे आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघसेलिब्रिटी
Open in App