Join us  

Big Blow for Chennai Super Kings : IPL 2022 आधीच MS Dhoniची निम्मी ताकद संपणार; CSKचा मॅच विनर खेळाडू माघार घेणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 5:58 PM

Open in App
1 / 9

आयपीएल २०२२ चे संपूर्ण पर्व महाराष्ट्रात खेळवण्याच्या हालचाली बीसीसीआयने आधीपासूनच सुरू केल्या आहेत. वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि नवी मुंबईतील डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर आयपीएलचे साखळी फेरीचे सामने खेळवण्याचा विचार सुरू आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियम स्टँड बाय ठेवण्याचा प्रस्ताव आहे. आयपीएल २०२२चे साखळी फेरीतील ५५ सामने मुंबईत, तर १५ सामने पुण्यात खेळवण्यात येणार आहेत.

2 / 9

५५ सामने वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डी वाय पाटील स्टेडियम येथे खेळवण्यात येतील, तर पुण्याच्या स्टेडियमवर १५ सामने होणार आहेत, अशी माहिती Cricbuzz ने दिली आहे. त्यानंतर प्ले ऑफचे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येतील.

3 / 9

Cricbuzzने आधी दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल २०२२ला २६ किंवा २७ मार्चपासून सुरूवात होणार आहे. २९ मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येईल, प्ले ऑफचे स्थळ अद्याप ठरले नसले तरी अहमदाबादचा विचार सुरू आहे. २४ तारखेला होणाऱ्या आयपीएल गव्हर्निंगा कांऊसिलच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल.

4 / 9

पण, त्याआधी चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) मोठा धक्का देणारी बातमी समोर येत आहे. आयपीएल २०२१मध्ये बाजी मारून आयपीएलचे चौथे जेतेपद नावावर करणाऱ्या चेन्नईचा मॅच विनर खेळाडू माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. CSK ने २०१०, २०११, २०१८ व २०२१ मध्ये आयपीएल जेतेपद पटकावले आहे.

5 / 9

चेन्नईने आयपीएल २०२२साठी महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड या चौघांना संघात कामय राखले आणि आयपीएल २०२२ ऑक्शनमध्ये दीपक चहर ( Deepak Chahar) साठी १४ कोटी मोजले. दीपक हा चांगला अष्टपैलू म्हणून समोर आला आहे आणि त्याने अनेकदा संघाला गोलंदाजी व फलंदाजीने विजय मिळवून दिले आहेत.

6 / 9

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत दीपक चहरच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते आणि त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर दीपकने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली आणि आता तो आयपीएल २०२२मधूनही माघार घेणार असल्याची शक्यता TOIच्या वृत्तानुसार व्यक्त केली जात आहे.

7 / 9

सूत्रांच्या माहितीनुसार, ''दीपक चहरची दुखापत साधी वाटत नाही. तो आयपीएलमधूनही माघार घेऊ शकतो.'' मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून चेन्नई सुपर किंग्स सरावाला सुरूवात करणार आहेत.

8 / 9

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबीन उथप्पा ( २ कोटी), ड्वेन ब्राव्हो ( ४.२० कोटी), अंबाती रायुडू ( ६.७५ कोटी), दीपक चहर ( १४ कोटी), केएम आसिफ ( २० लाख), तुषार देशपांडे ( २० लाख), शिवम दुबे ( ४ कोटी), महीश थीक्साना ( ७० लाख), राजवर्धन हंगर्गेकर ( १.५० कोटी), सिमरजीत सिंग ( २० लाख), डेव्हॉन कॉनवे ( १ कोटी), ड्वेन प्रेटोरियस ( ५०लाख), मिचेल सँटनर ( १.९० कोटी), अॅडम मिल्ने ( १.९० कोटी), सुभ्रांषू सेनापती ( २० लाख), मुकेश चौधरी ( २० लाख), प्रशांत सोलंकी ( १.२० कोटी), ख्रिस जॉर्डन ( ३.६० कोटी), सी हरी निशांथ ( २० लाख), एन जगदीसन ( २० लाख), के भगत वर्मा ( २० लाख).

9 / 9

टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनी
Open in App