Join us  

Big News : पाकिस्तानचा संघ भारतात येणार, मोदी सरकारकडून आश्वासन; जय शाह यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 3:34 PM

Open in App
1 / 6

भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातला क्रिकेट सामना म्हणजे जगातील सर्व चाहत्यांसाठी पर्वणीच. टशन, थरार, वाद असा पूर्ण पॅकेज उभय देशांच्या सामन्यातून अनुभवायला मिळतो. पण, दोन्ही देशांमधील राजकीय परिस्थिती पाहता भारत-पाकिस्तान फक्त ICC आणि आशिया चषक स्पर्धेतच एकमेकांविरुद्ध खेळतात.

2 / 6

२००७म्ये पाकिस्तानचा संघ पाच वन डे व तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. त्यानंतर २०१२-१३मध्ये भारत दौऱ्यावर पाकिस्तान मर्यादित षटकांची द्विदेशीय मालिका खेळला होता. आता पाकिस्तानचा संघ या वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येणार आहे.

3 / 6

पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा मिळण्यावर साशंकता व्यक्त केली जात होती. पण, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पाकिस्तानी खेळाडूंना वर्ल्ड कप स्पर्धेसाठी व्हिसा मिळणार असल्याचे आश्वासन सरकारकडून मिळाल्याची माहिती दिली. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा भारतीय भूमीत क्रिकेटचा थरार रंगण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

4 / 6

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे चेअरमन एहसान मणी यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी खेळाडू व सपोर्ट स्टाफला व्हिसा मिळण्याची ग्वाही देण्यात यावी अशी विनंती आयसीसीकडे केली होती. ''भारतानं आम्हाला व्हिसाबाबत लेखी आश्वासन द्यावं अन्यथा वर्ल्ड कप भारतातून यूएईत खेळवण्यात यावा,''असे मत मणी यांनी व्यक्त केलं होतं.

5 / 6

बीसीसीआयच्या अॅपेक्स काऊंसिलची शुक्रवारी बैठक पार पडली आणि त्यात जय शाह यांनी माहिती दिली. क्रिकबजनं दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत सांगण्यात आले की,''ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये भारतात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील सहभागासाठी पाकिस्तानी संघ व मीडियाला व्हिसा देण्याबाबत मंजूरी मिळाली आहे. पाकिस्तानी फॅन्सबाबतचा निर्णय गृह मंत्रालय घेईल.'' ( Pakistan's cricket players will get visas to compete in the upcoming T20 World Cup in India this October, the BCCI's apex council has been told by the board secretary Jay Shah following 'government assurances')

6 / 6

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार असून ( Ahmedabad's Narendra Modi Stadium hosting the final) दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, धर्मशाला आणि लखनौ येथे वर्ल्ड कपचे सामने खेळवण्यात येणार असल्याचेही जय शाह यांनी सांगितले.

टॅग्स :आयसीसी विश्वचषक टी-२०भारत विरुद्ध पाकिस्तानबीसीसीआयजय शाह