Cricket Buzz»फोटो गॅलरी »Big News : सहा महिन्यांत दोन वेळा रंगणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबरBig News : सहा महिन्यांत दोन वेळा रंगणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 12:41 PMOpen in App1 / 7गेल्या दोन महिन्यांपासून या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयसीसीत विचारमंथन सुरू होते, दुसरीकडे यजमान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजन करण्याबद्दल असमर्थता दर्शवल्यानंतर अखेरीस आयसीसीला हा निर्णय घ्यावा लागला.2 / 718 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियात या स्पर्धेचे आयोजन होणार होते. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता ऑस्ट्रेलियाच्या सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन केला. 3 / 7मध्यंतरीच्या काळात सरकारने नियमांमध्ये शिथिलता आणली होती. परंतु रुग्णांची संख्या वाढताच सरकारने परत लॉकडाऊन घोषित केला आहे.4 / 7आयसीसीच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) आयपीएल खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना आता केंद्र सरकारची परवानगी मिळवावी लागणार आहे.5 / 7आयपीएलच्या तेराव्या पर्वाच्या आयोजनासाठी बीसीसीआयने तयारी सुरु केली आहे, शिवाय 26 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर ही तारीख निश्चित करून यूएईत स्पर्धा आयोजनाची तयारी सुरू झाली आहे. 6 / 729 मार्च ते 24 मे 2020 या कालावधीत आयपीएल स्पर्धा होणार होती, परंतु लॉकडाऊनमुळे ती पुढे ढकलण्यात आली. लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढल्यानं बीसीसीआयनं पुढील सुचनेपर्यंत ही लीग स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.7 / 7आयपीएलचा 13 वा हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झाल्यास सहा महिन्यांत क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या दोन मोसमाचा आस्वाद घेता येणार आहे. मार्च-मे 2021मध्ये पुन्हा आयपीएल खेळवण्यात येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications