क्रिकेटपटू दिनेश कार्तिकचा आज 33 वा वाढदिवस आहे. 2002 पासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळू लागला. दिनेश कार्तिक त्याच्या मैदानावरील कामगिरीसोबतच वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळेही चर्चेत राहिलाय.
दिनेश कार्तिकची पहिली पत्नी निकिता हिनं कार्तिकचा विश्वासघात करुन क्रिकेटपटू मुरली विजयसोबत लग्न केलं. या कारणामुळे रणजी सामना सुरू असताना तामिळनाडूच्या ड्रेसिंग रुममध्ये हे दोन्ही खेळाडू भिडले होते, असंही बोललं जातं. यानंतर दिनेश आणि निकिताचा घटस्फोट झाला. दिनेशनं घटस्फोट दिला, त्यावेळी निकिता गरोदर होती. निकितानंतर दिनेशच्या आयुष्यात दीपिका मल्लिकलची एंट्री झाली.
स्क्वॉशपटू दीपिका आणि दिनेश 2013 मध्ये एकमेकांना भेटले. त्यांच्यातील मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. मात्र त्यांनी याबद्दलची कबुली जाहीरपणे दिली नाही. त्यांनी अतिशय गुपचूप साखरपुडा केला होता.
ऑक्टोबर 2014 मध्ये एका कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. आपण लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
दिनेश आणि दीपिका यांनी दोनवेळा एकमेकांशी विवाह केला. हिंदू आणि ख्रिस्ती रितीरिवाजांनुसार दोघेही विवाह बंधनात अडकले. दीपिका ख्रिश्चन असल्यानं ख्रिस्ती प्रथा परंपरेनुसारही दोघांनी लग्न केलं.