Cricket Buzz»फोटो गॅलरी »Birthday Special : जहीर खानची फटकेबाजीBirthday Special : जहीर खानची फटकेबाजी By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2018 12:48 PMOpen in App1 / 7भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानचा आज वाढदिवस. महाराष्ट्राच्या श्रीरामपुर येथे त्याचा जन्म. त्याला इंजिनियर बनायचे होते, परंतु त्याने ट्रॅक बदलला. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने नॅशनल क्रिकेट क्लबमध्ये खेळण्यास सुरुवात केली.2 / 7भारतीय क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांमध्ये कपिल देव यांच्यानंतर जहीरचेच नाव घेतले जाते. 7 ऑक्टोबर 1978 मध्ये त्याचा जन्म. 3 / 7त्याने 92 कसोटी, 200 वन डे आणि 17 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यात त्याने कसोटीत 1231 आणि वन डेत 792 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावक 311 आणि वन डेत 282 विकेट घेतल्या आहेत. 4 / 72008 ते 2012 या कालावधीत त्याला बऱ्याच वेळा दुखापतीमुळे आत-बाहेर करावे लागले. 2013 मध्ये त्याने कसोटीत 300 विकेट पूर्ण केले आणि अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. कपिल देव यांनी 434 विकेट घेतल्या आहेत.5 / 7जहीरने फलंदाजीतही आपली छाप सोडली आहे. त्याने झिम्बाब्वेच्या हेनरी ओलोंगाच्या षटकात सलग चार चौकार मारले होते. 6 / 7त्याच्या गोलंदाजीचा अंदाज भल्याभल्या फलंदाजांना बांधता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथला त्याने सर्वाधिक 13 वेळा बाद केले. 7 / 723 नोव्हेंबर 2017 मध्ये त्याने अभिनेत्री सागरिका घाटगेशी लग्न केले. आणखी वाचा Subscribe to Notifications