बॉलिवूडची 'सुंदरी'! भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूच्या पत्नीचा बोल्ड लूक; चाहते क्लिन बोल्ड

बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते जगजाहीर आहे.

क्रिकेट आणि बॉलिवूड... तमाम भारतीयांना आपलेसे करण्यात या दोन क्षेत्रांनी कोणतीच कसर सोडली नाही. भारतात क्रिकेट म्हणजे जणू काही धर्मच... या धर्माचे कोट्यवधी चाहते आहेत.

बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते जगजाहीर आहे. विराट कोहली, हरभजन सिंग, झहीर खान यांसारख्या क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींशी विवाहगाठ बांधली.

भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंग हा आम आदमी पार्टीचा खासदार आहे. त्याला 'आप'ने राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले. हरभजनची पत्नी आणि अभिनेत्री गीता बसरा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.

ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. क्रिकेटपटूच्या पत्नीने आपले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

गीता बसरा ही बॉलिवूडची अभिनेत्री आहे, पण तिला म्हणावी तशी आपली छाप सोडता आली नाही.

गीताने आता काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. गीता मागील काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. तिने २००६ मध्ये 'दिल दिया है'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

२००७ मध्ये ती पुन्हा इमरान हाश्मीसोबत 'द ट्रेन'मध्ये झळकली होती. मात्र या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळू शकले नाही.

२०१५ मध्ये हरभजन सिंग आणि गीता बसराने मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले आणि या दोघांना आता दोन मुली आहेत.