Join us

बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्री आल्या क्रिकेटपटूंच्या अफेअरनंतर चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 18:06 IST

Open in App
1 / 7

तमन्ना भाटीया ही भारताचा कर्णधार विराट कोहलीबरोबरच्या अफेअरनंतर जास्त चर्चेत आली. विराट आणि तमन्ना यांच्यामध्ये २०१२ -१३ या वर्षांमध्ये अफेअर असल्याचे बोलले जात होते.

2 / 7

आमीर खानच्या गजनी या चित्रपटामध्ये असून नावाची अभिनेत्री होती. ही जेवढी आपल्या चित्रपटांमुळे प्रसिद्ध झाली नाही तेवढी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबरोबरच्या अफेअरमुळे चर्चेत आल्याचे म्हटले जाते.

3 / 7

बॉलीवूडमधील अभिनेत्री आणि भारताचे माजी कर्णधार व विद्यमान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचे अफेअर असल्याची जोरदार चर्चा होती. नगमा ही या अफेअरनंतर चांगलीच चर्चेत राहिली होती.

4 / 7

भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा आणि सोफिया हयात यांचे अफेअर चांगलेच गाजले होते. यापूर्वी सोफियाबाबत लोकांना जास्त माहिती नव्हती, पण रोहितबरोबरच्या अफेअरच्या चर्चेनंतर सोफिया प्रकाशझोतात आली.

5 / 7

भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खान आणि इशा श्रवाणी यांच्या अफेअरच्या बातम्या चांगल्याच गाजल्या होत्या. त्यावेळी झहीर प्रसिद्ध असला तरी इशाला जास्त लोकं ओळखतं नव्हतं. या अफेअरच्या चर्चेनंतर इशाला जास्त प्रसिद्धी मिळाली.

6 / 7

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग आणि किम शर्मा यांच्यामध्ये बराच काळ अफेअर असल्याची चर्चा होती. त्यावेळी युवराजला सर्वच ओळखत असले तरी किमला मात्र जास्त लोकांनी पाहिलेही नव्हते.

7 / 7

महेंद्रसिंग धोनीचे टॉलीवूडमधील राई लक्ष्मीबरोबर अफेअर असल्याची चर्चा होती. या गोष्टीमुळे लक्ष्मी चांगलीच प्रसिद्ध झाली होती.

टॅग्स :विराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीरोहित शर्मायुवराज सिंगसौरभ गांगुलीझहीर खान