Cricket Buzz»फोटो गॅलरी »Boom, Boom जसप्रीत बुमरा!Boom, Boom जसप्रीत बुमरा! By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 2:10 PMOpen in App1 / 8भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराने बॉक्सिंग डे कसोटीच्या चौथ्या दिवशीही सातत्यपूर्ण कामगिरीचे सत्र कायम राखले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सहा विकेट घेणाऱ्या बुमराने दुसऱ्या डावात पहिल्या चार फलंदाजांमध्ये दोन विकेट टिपल्या. बॉक्सिंग डे कसोटीत त्याने मोडलेल्या विक्रमांबद्दल जाणून घेऊया..2 / 8कारकिर्दीत प्रथमच बुमराने एका सामन्यात आठ विकेट घेतल्या आहेत. बुमराने पहिल्या डावात 6 विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीसह त्याने कपिल देव व अजित आगरकर यांच्या विक्रमाशीही बरोबरी केली. कपिल देव यांनी 1985 व 1992 साली अॅडलेड कसोटीत अनुक्रमे 8/109 आणि 8/163 अशा कामगिरीची नोंद केली होती. त्यानंतर आगरकरने 2003 मध्ये अॅडलेड येथेच 8/160 अशी कामगिरी केली. 3 / 8बुमराने आतापर्यंत 51 धावांत 8 बळी टिपले आहेत. या कामगिरीसह तो मेलबर्न कसोटी सर्वोत्तम कामगिरी करणारा दुसरा भारतीय ठरला आहे. त्याने 1985 साली रवी शास्त्री यांनी दोन्ही डावातं मिळून 179 धावांत 8 बळी ( 4/87 व 4/92) टिपले होते. 4 / 8बुमराने शनिवारी दोन विकेट घेत शास्त्रींना मागे टाकले. मेलबर्नवर बीएस चंद्रशेखर यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्यांनी 1977 साली 104 धावांत 12 बळी ( 6/52 व 6/52) टिपले होते. 5 / 8पदार्पणाच्या वर्षात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही बुमराने केला. त्याने 9 सामन्यांत 20.77 च्या सरासरीने 47 विकेट घेतल्या आहेत. बुमराने कॅलेंडर वर्षात 45 पेक्षा अधिक विकेट्स घेत मोहम्मद शमीला ( 44) मागे टाकले. याआधी 2006 मध्ये अनिल कुंबळेने कॅलेंडर वर्षात 41 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. बुमरा आणि शमी यांनी 2018 मध्ये हा विक्रम मोडला.6 / 8दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराने एका डावात पाचपेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. कॅलेंडर वर्षांत अशी कामगिरी करणारा तो पहिलाच आशियाई गोलंदाज आहे. 7 / 8त्याने आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे 54 धावांत 5 आणि इंग्लंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे 85 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या. मेलबर्नवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 33 धावांत 6 विकेट घेतल्या.8 / 8बुमराने या दौऱ्यात सहा डावांत एकूण 19 विकेट घेतल्या आहेत. त्याने 14.11 ची सरासरी राखली, तर 2.08 चा इकॉनॉमी रेट ठेवला. ऑस्ट्रेलियातील ही भारतीय गोलंदाजाची चौथी सर्वोत्तम कामगिरी आहे. या विक्रमात कपिल देव ( 8/106), अनिल कुंबळे ( 8/141) हे आघाडीवर आहेत. बुमराने अजित आगरकरचा ( 6/41) विक्रम मोडला. आणखी वाचा Subscribe to Notifications