'WTC' चे दहा वाघ! अश्विन-लायनचे वर्चस्व; स्टार्क-बुमराहचाही दबदबा, ऑस्ट्रेलियन्स वरचढ

डब्ल्यूटीसीच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन आणि लायन हे दोघे आघाडीवर आहेत.

जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धा (WTC) सुरू झाल्यापासून भारताचा रविचंद्रन अश्विन आणि ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने आपल्या फिरकीच्या तालावर सर्वाधिक फलंदाजांना नाचवले. म्हणूनच डब्ल्यूटीसीच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत हे दोघे आघाडीवर आहेत.

त्यानंतर वेगवान गोलंदाजांचा क्रमांक लागतो. फिरकीसाठी नंदनवन असलेल्या भारतीय खेळपट्यांवर अश्विनच्या फिरकीचे कोडे सोडवण्यात आजपर्यंत तरी कोणत्याही फलंदाजाला यश आलेले नाही.

दुसरीकडे नॅथन लायनचे विशेष कौतुक करावे लागेल. कारण, वेगवान गोलंदाजांसाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियन मैदानांवर लायनने आपल्या फिरकीचा डंका वाजवला आहे. एक नजर डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांवर.

१) नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया), सामने - ४३, डाव - ७८, बळी - १८७

२) आर अश्विन (भारत), सामने - ३६, डाव - ६९, बळी - १८०

३) पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया), सामने - ४२, डाव - ७८, बळी - १७५

४) मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), सामने - ३८, डाव - ७३, बळी - १४७

५) स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड), सामने - ३३, डाव - ६३, बळी - १३४

६) कगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका), सामने - २७, डाव - ४७, बळी - १२३

७) टीम साऊदी (न्यूझीलंड), सामने - ३१, डाव - ६२, बळी - ११७

८) जेम्स अँडरसन (इंग्लंड), सामने - ३६, डाव - ६५, बळी - ११६

९) जसप्रीत बुमराह - (भारत), सामने - २७, डाव - ५१, बळी - ११५

१०) जोश हेझलवुड (ऑस्ट्रेलिया), सामने - २६, डाव - ५०, बळी - १०९