Join us  

चहर, रशीद मलिंगा... ट्वेंटी-20तील हॅटट्रिकवीर माहित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 2:08 PM

Open in App
1 / 8

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त अफगाणिस्तानच्या रशीद खानने 2019मध्ये हॅटट्रिक घेण्याचा पहिला मान पटकावला. त्यानं आयर्लंडविरुद्ध 4 धावांत 4 विकेट्स घेतल्या होत्या.

2 / 8

श्रीलंका ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार लसिथ मलिंगानं न्यूझीलंडविरुद्ध चार विकेट्स घेत हॅटट्रिक नोंदवली होती.

3 / 8

पाकिस्तानचा 20 वर्षीय गोलंदाज मोहम्मद हस्नैन यानं श्रीलंकाविरुद्ध हॅटट्रिक नोंदवली होती. त्यानं सलग तीन चेंडूंवर भानूका राजपक्षा, दासून शनाका आणि शेहान जयसूर्या यांना बाद केले होते.

4 / 8

ओमानच्या खवार अलीनं नेदरलँडविरुद्ध 10 व्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर तीन फलंदाजांना माघारी पाठवले होते. 3 बाद 71 अशा धावसंख्येवरून नेदरलँड्सची अवस्था 6 बाद 71 अशी झाली होती. त्यांना केवळ 94 धावाच करता आल्या.

5 / 8

पापुआ न्यू गिनीच्या नोर्मन व्हानूआनं आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रता फेरीत बर्मुडाविरुद्ध हॅटट्रिक नोंदवली होती.

6 / 8

भारताच्या दीपक चहरनं बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत हॅटट्रिक घेत विक्रमाला गवसणी घातली.

7 / 8

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत हॅटट्रिक घेणारा तो पहिला भारतीय पुरुष गोलंदाज ठरला.

8 / 8

त्यानं त्या सामन्यात 7 धावांत 6 विकेट घेऊन ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीचीही नोंद केली.

टॅग्स :लसिथ मलिंगाआयसीसीटी-20 क्रिकेट