ब्रेकअपच्या वार्ता अन् टीम इंडियाचा स्टार गर्लफ्रेंडसोबत काश्मीरला पोहोचला; एकसारखेच फोटो, योगायोग तर नाही...

काश्मीरमध्ये तो एकटा नाहीय तर त्याच्या सोबत त्याची रुमर्ड प्रेयसी देखील आहे. आता ही अफवा वाली गर्लफ्रेंड आहे की खरी ते तुम्हीच ठरवा...

टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज पृथ्वी शॉ सध्या काश्मीरमध्ये फिरायला गेलाय. तो नुकताच न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 मालिकेत टीम इंडियात होता.

काश्मीरमध्ये पृथ्वी शॉ एकटा नाहीय तर त्याच्या सोबत त्याची रुमर्ड प्रेयसी देखील आहे. आता ही अफवा वाली गर्लफ्रेंड आहे की खरी ते तुम्हीच ठरवा...

निधी तापडिया देखील काश्मीरमध्ये आहे. दोघांनीही आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. एकत्र फोटो जरी काढलेले नसले तरी दोघेही बर्फातच आहेत. म्हणजे एकत्रच नाही का...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पृथ्वी शॉ आणि निधी तापडिया एकमेकांना डेट करत आहेत. अलीकडेच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येत होत्या. पण आता ते पुन्हा एकदा एकत्र दिसत आहेत.

पृथ्वी शॉ आणि निधी तापडिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरींमध्ये हिमवर्षावाचा एकसारखाच व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी स्वर्ग असे म्हटले आहे. आता एवढा तर योगायोग नाही ना होऊ शकत.

दोघांनी सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते काश्मीरच्या घाटीत फिरताना दिसत आहेत.

निधी तापडिया एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतात. निधी तापडियाचे इंस्टाग्रामवर 108K फॉलोअर्स आहेत. ती महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे.

नवीन वर्षाची पार्टी करण्यासाठी पृथ्वी शॉ एका पबमध्ये गेला होता. या पार्टीत निधी तापडिया देखील त्याच्यासोबत दिसली होती. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

पृथ्वी शॉ याआधी अभिनेत्री प्राची सिंगला डेट करत होता. 2020 मध्येही दोघांच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या. आता या दोघांनी इन्स्टावरून एकमेकांना अनफॉलो केले आहे.