'गब्बर' पुन्हा पडलाय प्रेमात? कोण आहे ती मिस्ट्री गर्ल जी दुबईत शिखर धवनसोबत दिसली?

...अन् सोशल मीडियावर रंगली शिखर धवन अन् परदेशी छोरीच्या प्रेमाची चर्चा

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताचा माजी क्रिकेटर शिखर धवनची हवा पाहायला मिळत आहे. तो यंदाच्या हंगामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ब्रॅंड ॲम्बेसिडरपैकी एक आहे.

भारत-बांगलादेश यांच्यातील सामन्याआधी शिखर धवनची मैदानात खास झलकही पाहायला मिळाली. भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मासह तो अन्य खेळाडूंच्या भेटीगाठी घेताना दिसले.

आता सोशल मीडियावर त्याचा व्हिआयपी स्टँडमधील एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. ज्यात तो एका मिस्ट्री गर्लसोबत मॅचचा आनंद घेताना दिसते.

शिखर धवनसोबत स्टँडमध्ये बसलेली ती मिस्ट्री गर्ल कोण? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

धवन या मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही तो एअरपोर्टवर याच परदेशी छोरीसोबत दिसला होता. त्यामुळे घटस्फोट झाल्यावर तो पुन्हा प्रेमात पडलाय का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

धवन अन् परदेशी छोरीच्या डेटिंग-सेटिंगसंदर्भात अधिकृतरित्या कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण पुन्हा एकदा तो तिच्यासोबत दिसल्यामुळे क्रिकेटरच्या प्रेमाच्या खेळाची चर्चा रंगण्यास सुरुवात झालीये.

शिखर धवनसोबत दिसलेल्या या तरुणीचं नाव सोफी शाइन असं असून ती एक प्रोडक्ट कन्सल्टंट आहे, असेही बोलले जाते.

सोफीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन फॅमिलीसोबत धवनचे काही फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळेच दोघांच्यात एक खास बॉन्डिंग असल्याचेही दिसून येते.