PHOTOS : विविध भूमिकांमध्ये दिसणारी 'स्टार'! दिल्ली प्रीमिअर लीगही गाजवली; पाहा सौंदर्य शेफालीचे

shefali bagga photo : क्रिकेटच्या स्पर्धा गाजवणारी शेफाली बग्गा.

सोशल मीडियाच्या या जगात अनेक कलाकारांनी छोटी सुरुवात करुन गरुडझेप घेतली. याचेच एक उदाहरण म्हणजे स्पोर्ट्स अँकर शेफाली बग्गा.

विश्वचषक, आयपीएल ते लीजेंड्स लीग क्रिकेट यांसारख्या स्पर्धांमध्ये दिसणारी शेफाली नेहमी चर्चेत असते. ती नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.

पत्रकार मग बिग बॉसमध्ये दिसणारी शेफाली ग्लॅमरस फोटोंमुळे देखील ओळखली जाते. ती नुकतीच दिल्ली प्रीमिअर लीगमध्ये दिसली. या स्पर्धेत रिषभ पंतसारखे नामांकित खेळाडू सहभागी झाले होते.

सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या शेफालीचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती एक न्यूज अँकर राहिली आहे.

पत्रकारितेची नोकरी सोडल्यानंतर ती बिग बॉस सीझन १३ मध्ये झळकली होती. शेफालीने क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धा कव्हर केल्या आहेत.

नवी दिल्ली येथील शेफाली बग्गाने दूरचित्रवाणी पत्रकारिता आणि होस्टिंगमधील यशस्वी कारकीर्दीसह स्वतःला एका नव्या उंचीवर नेले.

शेफाली नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. खेळाबद्दलची तिची आवड आणि जिद्दीच्या जोरावर तिने मोठे यश मिळवले.

ती क्रीडा पत्रकारितेतील उत्कृष्टतेचे दीपस्तंभ म्हणून नेहमीच चमकत राहिली. तिच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांची आणि सहकाऱ्यांची प्रशंसा आणि आदर मिळवत ती प्रगती करत आहे.