Cricket Buzz»फोटो गॅलरी »ख्रिस गेलनं इंग्लंडला झपाटल्यासारखं झोडलं, पण...ख्रिस गेलनं इंग्लंडला झपाटल्यासारखं झोडलं, पण... By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 10:46 AMOpen in App1 / 10ख्रिस गेलनं सहा महिन्यानंतर वन डे संघात दमदार कमबॅक केले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात गेलने शतकी खेळी साकारली आणि वेस्ट इंडीज संघाला ३६० धावांचा डोंगर उभा करून दिला. 2 / 10ख्रिस गेलने कारकिर्दीतील २४ वे शतकं शंभर चेंडूत पूर्ण केले. या सामन्यात गेलनं तुफान फटकेबाजी केली. त्यानं जवळपास १२ षटकार ठोकले. 3 / 10वन डे क्रिकेटमध्ये तीन प्रतिस्पर्धीविरुद्ध एकाच सामन्यात १० पेक्षा अधिक षटकार खेचले आहेत आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. 4 / 10गेलने याआधी झिम्बाब्वे ( २०१५) आणि संयुक्त अरब अमिराती ( २०१८) यांच्याविरुद्ध अशी कामगिरी केली आहे. त्याने यासह एबी डिव्हिलियर्स, मार्टिन गुप्तील आणि रोहित शर्मा यांना मागे टाकले. या तिघांना दोनदाच एका सामन्यात १० पेक्षा अधिक षटकार मारता आले आहेत.5 / 10ख्रिस गेलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध १०० षटकारांचा विक्रम केला आणि असे शतक ठोकणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्यानं इंग्लंडविरुद्ध वन डे त ५७, ट्वेंटी-२०त २८ आणि कसोटीत १५ षटकार मारले. 6 / 10आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही गेलनं नावावर केला. त्याने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा ४७६ षटकारांचा विक्रम मोडला. 7 / 10गेलच्या नावावर ४८८ आंतरराष्ट्रीय षटकार जमा झाले आहेत. त्याने वन डेत २८७,ट्वेंटी-२० त १०३ आणि कसोटीत ९८ षटकार लगावली आहेत. यातील ४८७ षटकार हे वेस्ट इंडीज संघाचे प्रतिनिधित्व करताना, तर एक षटकार जागतिक एकादश संघाकडून मारला आहे. 8 / 10गेलनं या सामन्यात १२ षटकार खेचून आणखी एक विक्रम नावावर केला. एकाच वन डे सामन्यात सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या विंडीज खेळाडू दिनेश रामदिनचा (११) विक्रमत्यानं मोडला. रामदिननं २०१४ मध्ये बांगलादेशविरुद्ध ११ षटकार लगावले होते. 9 / 10पण गेलच्या या विक्रमांना इंग्लंडच्या जेसन रॉय ( १२३) आणि जो रूट (१०२) यांनी सडेतोड उत्तर दिले आणि संघाला ६ विकेट राखून विजय मिळवून दिला. 10 / 10सर्वाधिक २३ षटकारांचा विक्रमही वेस्ट इंडिज वि. इंग्लंड या सामन्यात नोंदवला गेला. २०१४ मध्ये न्यूझीलंड वि. वेस्ट इंडिज या सामन्यात २२ षटकार लागले होते. वन डे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग कराणारा तिसरा यशस्वी सामना ठरला आहे. इंग्लंडने यासह भारत वि. ऑस्ट्रेलिया यांचा (३६० धाव ) विक्रम मोडला. आणखी वाचा Subscribe to Notifications