Cricket Buzz»फोटो गॅलरी »Bad News : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर क्रिकेटची मोठी लीग 2020मध्ये होणार नाहीBad News : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर क्रिकेटची मोठी लीग 2020मध्ये होणार नाही By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 10:17 AMOpen in App1 / 9कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या. कोरोना व्हायरसचा जगभरात वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा होणारी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आली.2 / 9ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली. ही स्पर्धा 2021मध्ये आयोजित करण्याची घोषणा झालीय, परंतु त्यावरही अनिश्चिततेचं सावट आहे.3 / 9भारतीयांना ज्याची उत्सुकता असते त्या इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल)च्या 13 व्या मोसमावरही अनिश्चिततेचं सावट आहे. 29 मार्चला सुरू होणारी ही आयपीएल दोन वेळा पुढे ढकलण्यात आली.4 / 9देशातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आणि तेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) पुढील सुचनेपर्यंत स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.5 / 9सध्याची परिस्थिती लक्षात घेता आशिया चषक आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणार की नाही, याबाबतही साशंकता आहे. त्यात शुक्रवारी क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली.6 / 9ट्वेंटी-20 लीगच्या धर्तीवर यंदापासून नव्यानं सुरू होणाऱ्या 'The Hundred' लीग रद्द करण्याचा निर्णय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं ( ECB) घेतला आहे.7 / 9इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा अधिक भरणा असलेल्या या लीगचे पहिले मोसम 2021मध्ये खेळवण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.8 / 9कोरोना व्हायरसमुळे यंदा ही लीग खेळवणे शक्य नसल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. परदेशी खेळाडूंवरील प्रवास बंदीमुळे या लीगमध्ये खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या सहभाग होणे अश्यक्य आहे.9 / 9ECB चे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरीसन यांनी सांगितले की,''सद्य परिस्थिती लक्षात घेता यंदा The Hundred लीग होणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही निराश आहोत, परंतु ही लीग 2021मध्ये खेळवण्यात येईल.'' आणखी वाचा Subscribe to Notifications