Corona Virus मुळे रखडली 11 क्रिकेटपटूंची लग्न; कधी पूर्ण होणार बोहल्यावर चढण्याचं स्वप्न?

ऑस्ट्रेलियात लॉकडाऊन जाहीर केले गेले आहे आणि त्यामुळे दोन ते पाच लोकांना एका ठिकाणी एकत्र येता येत आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगाला ठप्प केलं आहे. जगभरात अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्यामुळे खेळाडूंना घरीच थांबावे लागले आहे. पण, याच कोरोनामुळे अनेक क्रिकेटपटूंचे बोहोल्यावर चढण्याचं स्वप्न लांबणीवर पडलं आहे.

दक्षिण आफ्रिकेची महिला क्रिकेटपटू लिझेले ली आणि तांझा यांचे लग्न कोरोनामुळे पुढे ढकलण्याचे वृत्त ताजे असताना कोरोनाचा फटका अन्य क्रिकेटपटूंनाही बसल्याचे समोर येत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघातील प्रमुख फिरकीपटू अॅडम झम्पाला त्याचं लग्न पुढे ढकलावे लागत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा गोलंदाज जॅक्सन बर्ड याचेही लग्न लांबणीवर पडले आहे.

गोलंदाज मिचेल स्वेप्सन यानं 2018मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघात पदार्पण केले होते.

ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत क्विन्सलँड संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अॅलिस्टर मॅकडेर्मोटचेही लग्न लांबणीवर पडले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या वन डे व ट्वेंटी-20 संघाचा सदस्य अँण्ड्य्रू टाय हाही लग्न करणार होता पण आता त्याला नवा मुहूर्त शोधावा लागेल

ऑस्ट्रेलिया महिला संघाची अष्टपैलू खेळाडू जेस जॉनासेन हिचही लग्न लांबणीवर पडले आहे.

कॅटेलीन फ्रिएट हीचं लग्न एप्रिलमध्ये होणार होते.

ग्लेन मॅक्सवेल यानेही अजून लग्नाचा मुहूर्त काढलेला नाही. त्यानं नुकतंच भारतीय वंशाच्या विनी रमणशी साखरपुडा केला.

ऑसी गोलंदाज पॅट कमिन्स याचेही लग्न लांबणीवर पडले आहे.

लॉकडाऊन असतानाही डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.