Cricket Buzz»फोटो गॅलरी »Corona Virus : पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल Shoaib Akhtarचं मोठं विधान; म्हणाला...Corona Virus : पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल Shoaib Akhtarचं मोठं विधान; म्हणाला... By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 10:09 AMOpen in App1 / 9कोरोना व्हायरसशी संपूर्ण जग लढा देत असताना पाकिस्तानी खेळाडू आजही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. 2 / 9जोपर्यंत मोदी पंतप्रधान आहेत, तो पर्यंत भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका होणे अशक्य, असे विधान पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं केलं होतं. 3 / 9पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरचं काही वेगळंच म्हणणं आहे. रविवारी त्यानं पोस्ट केलेल्या एका व्हिडीओतून पंतप्रधान मोदींबद्दल मोठं विधान केलं. 4 / 9कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिकेचे आयोजन करावे, असा प्रस्ताव अख्तरनं ठेवला होता.5 / 9 भारत-पाकिस्तान यांच्यात तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवावी आणि त्यातून उभा राहणारा निधी दोन्ही देशांत समसमान वाटावा, असं अख्तरचं म्हणणं होतं. 6 / 9भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेवर अख्तरनं पुन्हा एकदा भाष्य केले. तो म्हणाला,''भारत आणि पाकिस्तान सासू-सुनासारखे रुसले आहेत. चर्चेने सर्व प्रश्न सोडवले जातील, परंतु त्यासाठी कोणीच तयार नाही.'' 7 / 9या कालावधीत अख्तरनं भारताने पाकिस्तानला मदत करावी असं आवाहनही केलं होतं. त्यानं भारताकडे 10 हजार व्हेंटिलेटर बनवून देण्याची विनंती केली होती. 8 / 9पाकिस्तानी गोलंदाजानं रविवारी मोदींचे कौतुक केले. तो म्हणाला,''कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी नरेंद्र मोदींनी योग्य वेळी योग्य पाऊल उचलले. भारतानं लॉकडाऊनचा घेततेला निर्णय योग्यच आहे.''9 / 9भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेवर अख्तरनं पुन्हा एकदा भाष्य केले. तो म्हणाला,''भारत आणि पाकिस्तान सासू-सुनासारखे रुसले आहेत. चर्चेने सर्व प्रश्न सोडवले जातील, परंतु त्यासाठी कोणीच तयार नाही.'' आणखी वाचा Subscribe to Notifications